Breaking News

हनुमान चालिसा काही राणा दाम्पत्यांना साथ देईना, आता मिरवणूकीमुळे गुन्हा दाखल रात्री उशीरापर्यत मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हे दाखल

सर्वसाधारणत: अडचणीच्या काळात किंवा एकाद्या गोष्टीपासून भीती वाटत असेल तर त्यापासून सुटका करण्यासाठी हनुमान चालिसा किंवा मारूती स्त्रोत म्हणण्यात येते. परंतु राजकिय आखाड्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान देण्यासाठी राणा दांम्पत्याकडून सातत्याने हनुमान चालिसा चा आधार घेत व्हाया हनुमान मार्गे ताकद दाखविण्याचा प्रयत्न शिवसेनेला केला जात आहे. मात्र राणा दांमप्त्याकडून जसजसे हनुमान चालिसाचे पठण केले जात आहे तसतसे त्यांच्यावर कायदेशीर कारवायाचा बडगा उगारला जात आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे आव्हान देत शिवसेनेला डिवचले. परंतु झाले उलट लोकप्रतिनिधी असनूही दोन गटात तेढ निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली आणि शासकिय यंत्रणेला प्रतिआव्हान दिले म्हणून राणा दांम्पत्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला. बर त्यानंतर त्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रियेत जामीन मिळविण्यात वेळ गेल्याने या दाम्पत्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागले. त्यातून मोकळे होत नाहीच ते दिल्लीवारी करून परत ३६ दिवसांनी अमरावतीत परतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी राणा दाम्पत्याची मोठी वाजत गाजत मिळवणूक काढली. परंतु शासकिय नियमाच्या वेळेपेक्षा अधिक काळ मिरवणूक काढत ध्वनी प्रदुषण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर पुन्हा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, रात्री उशिरापर्यंत ध्वनिप्रदूषण यासह विविध कलमांन्वये राणा दांपत्यासह १५ कार्यकर्त्यांच्या विरोधात राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

तब्बल ३६ दिवसांनंतर राणा दांपत्याचे शनिवारी रात्री अमरावतीत आगमन झाले. नागपूर ते अमरावती या प्रवासादरम्यान, त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. येथील इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर राणा दांपत्याची स्वागत मिरवणूक राजकमल चौकात पोहचली.‍ तेथे आल्यानंतर राणा दांमप्त्यांनी डॉ.आबेंडकरांच्या पुतळ्यासमोरच हनुमान चालिसा म्हणण्याचा प्रयत्न केला. त्यासस्थानिक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी विरोध करत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हनुमान पठण करण्याऐवजी संविधानाची पठण करा अशी मागणी केली. त्यामुळे तेथे गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल म्हणून पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मिरवणूक राजकमल चौकात पोहोचल्यावर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राणा दांपत्याचे स्वागत भल्या मोठ्या हाराने करण्यात आले. यावेळी नवनीत राणा यांनी गदा फिरवून कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला प्रतिसाद दिला. राणा दांपत्याने रवीनगर परिसरातील हनुमान मंदिरात पोहचून हनुमान चालिसाचे पठण आणि आरतीत सहभाग घेतला. रात्री १० वाजेनंतरही या ठिकाणी भोंग्यांचा वापर सुरू होता, असा आक्षेप आहे.

राणा दाम्पत्य शंकरनगर परिसरातील निवासस्थानी पोहचल्यानंतर त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. राणा दांपत्याच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.‍ या स्वागत मिरवणुकीदरम्यान रस्ता अडवणे, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे आणि ध्वनिप्रदूषणासाठी कारणीभूत ठरणे, यासह विविध कलमांन्वये नवनीत राणा, रवी राणा आणि इतर १५ जणांच्या विरोधात राजापेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची माहिती माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली.

Check Also

परराष्ट्र मंत्रालयाची तीव्र नाराजी, अमेरिकेचा मानवी हक्क अहवाल हा पक्षपाती

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी म्हटले आहे की यूएस स्टेट डिपार्टमेंटने जारी केलेला मानवी हक्क अहवाल “खूप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *