Breaking News

शाहरूख खानवरच्या “त्या” ट्रोलींगवरून शिवसेना नेते संजय राऊतांनी फटकारले त्यांना काही अक्कल आहे का? हा नालायकपणा बंद करा

मराठी ई-बातम्या टीम

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर काल संध्याकाळी अंत्यसस्काराच्या वेळी अंत्यदर्शन घेताना बॉलीवूड किंग शाहरूख खान आणि त्याची व्यवस्थापक पूजा ददलानी यांनी लता मंगेशकर यांच्या पुष्प अर्पण करत त्यांच्यासाठी दुआ मागत आणि प्रार्थना केली. त्यावेळी शाहरूख खान याने दुआ मागितल्यानंतर एकाबाजूला तोंड करत फुंकर मारली. यासंदर्भातील व्हायरल व्हिडिओचा आधार घेत मात्र काहीजणांनी मंगेशकरांच्या पार्थिवावर थुंकला असल्याची खोटी अफवा पसरविण्यास सुरुवात करत शाहरूखला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या कृतीवरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाच्या त्या ट्रोलकऱ्यांना चांगलेच फटकारले.

या ज्या पद्धतीने शाहरुखला ट्रोल केलं जातंय तो नालायकपणा, बेशमरपणा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया देत धर्म, जात, द्वेष यापलीकडे काही सुचत नाही, असाही टोलाही त्यांनी यावेळी लगावला. हे कोण लोक आहेत? यांना थोडीही लाज नाहीय. हे निर्लज्ज लोक आहेत, जे अशावेळीही धर्म, जात यांचा राजकारणासाठी आधार घेतात. मी याची निंदा करतो. तुम्ही लताजींनाही सोडलं नाही असा खोचक सवालही त्यांनी केला.

एका गटाचे, एका परिवाराचे लोक त्यांना ट्रोल करतायत, आयटी सेलचे लोक. हा काय प्रकार आहे. हा नालायकपणा आहे, हा बेशरमपणा आहे. तुम्ही एखाद्या महान व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुद्धा एखाद्या महान कलाकाराला ट्रोल करता. त्याची बदनामी करता. धर्म, जात, द्वेष यापलीकडे तुम्हाला काही सुचत नाही. तुम्ही देशाची वाट लावलीय अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

लतादीदींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या मंचावर शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत गेला. पुजाने हात जोडून तर शाहरुखने दुवाँ मागून लतादीदींना शेवटचा निरोप दिला. मात्र हा फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये शाहरुख लतादीदींच्या पार्थिवावर थुंकल्याचा दावा काहींनी केला. अर्थात या दाव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी शाहरुखवर टीका केली.

दरम्यान, इस्लामची माहिती असणाऱ्या अनेकांनी हा दावा खोडून काढत शाहरुखने मास्क खाली घेऊन पार्थिवाकडे पाहून फुंकर मारल्याचे सांगत एखाद्या व्यक्तीला अखेरचा निरोप देताना त्याच्या पार्थिवावर फुंकर मारल्यास पार्थिवासोबतच्या नकारात्मक शक्ती दूर लोटल्या जातात असा समज आहे. त्यामुळेच इस्लाम रिवाजानुसार मृत व्यक्तीच्या पार्थिवावर फुंकर मारली जात असल्याचे स्पष्ट केले.

शाहरुखने लतादीदींना अखेरचा निरोप देतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लतादीदींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या मंचावर शाहरुख त्याची व्यवस्थापक पूजा ददलानीसोबत गेला. पुजाने हात जोडून तर शाहरुखने दुवाँ मागून लतादीदींना शेवटचा निरोप दिला. हा फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. शाहरुखने दुवाँ मागितल्यावर पुढे हात जोडून नमस्कारही केला.

शाहरुख खानच्या याच कृतीचं सगळीकडे कौतुक होत आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही पद्धतीने प्रार्थना केल्याने शाहरुख खानचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. तसेच त्याचा फोटो शेअर करत हा खरा भारत आहे अशी कॉमेंटही करण्यात येत आहे.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *