Breaking News

उर्मिला मातोंडकर म्हणाल्या “थूकना नही दुआ फुँकना कहेते है” आता मलाही ट्रोल करतील

मराठी ई-बातम्या टीम

गानसम्राज्ञीला अखेरचा निरोप देताना बॉलीवूड किंग शाहरूख खान यांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवासमोर उभे राहुन त्यांच्यासाठी हुऑ मागितली आणि त्यानंतर फुंकर मारली. परंतु काही नेटकऱ्यांनी शाहरूख खानने थुंकला म्हणून त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोल करणाऱ्यांना हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी चांगलेच सुणावले असून त्या गोष्टीला “थूकना नही दुआ फुँकना कहेते है” असे ट्विट करत प्रतित्युर दिले.

याशिवाय एका मराठी वृत्त वाहिन्याशी बोलताना त्या म्हणाल्या की, मी एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केले म्हणून आता ट्रोलकरी मलाही ट्रोल करतील असे सांगत इस्लाममध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर असलेल्या वाईट विचारांना दूर सारण्यासाठी दुऑ पढल्यानंतर फुंकर मारली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, “प्रधानमंत्री जी की फ़ोटो तो लगा रखी हैं, उनसे कुछ सीखा होता। भारत माँ कीं अनमोल बेटी का गाना सुनें “ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान” आज का दिन तो छोड देते, असा उपरोधिक टोलाही ट्विटवरून टोलकऱ्यांना लगावला.

मात्र एकाबाजूला बॉलीवूड किंग शाहरूख खान यांच्या त्या फुंकर मारण्याच्या कृतीला काहीजणांकडून जाणीवपूर्वक ट्रोल करण्यात येत असताना दुसऱ्याबाजूला भारतीय संस्कृतीचे अनोखे दर्शन असल्याची प्रतिक्रिया शाहरूख आणि त्यांच्या व्यवस्थापक ददलानीच्या फोटोला उद्देशून व्यक्त करत हा खरा भारत, कोणतीही द्वेषमुलक भावना या गोष्टीला तोडू शकत नाही सारख्या विशेषणांनी शाहरूखच्या कृत्याचे कौतुक केले आहे.

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी तर या ट्रोलवरून ट्रोलकऱ्यांना चांगलेच फटकारले असून यांना काही अक्कल नाही असे सांगत असला नालायकपण बंद करा असा सज्जड इशारा देत काही ठराविक परिवारातील आणि पक्षाच्या आयटी सेलकडून असली कृत्ये करण्यात येत असल्याचा आरोप करत भाजपाचे नाव न घेता टीका केली.

 

Check Also

शरद पवार यांची खोचक टीका, …नरेंद्र मोदी यांचे स्टेटमेंट मूर्खपणाचे

नरेंद्र मोदी यांच्याकडे दुसरं सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *