Breaking News

मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, दादा, कार्यकर्ते ठेकेदारांसाठी सर्वपक्षिय बैठक घ्यावी लागेल अजित पवार यांना उद्देशून वक्तव्य करत नवे पोर्टल बनविणार असल्याची माहिती

विधानसभेचे नियोजित कामकाज सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. यावेळी भिवंडी-पालघर दरम्यानच्या खराब रस्त्याचा प्रश्न भाजपाच्या आमदारांकडून उपस्थित करण्यात आला. मात्र रस्त्याची कामे देताना कार्यकर्त्ये ठेकेदार आणि मोठ्या कंत्राटदारांना कशी दिली जातात याची एकप्रकारे गौप्यस्फोटच भाजपाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केला.
यावेळी भिवंडी-पालघर रस्त्याचा मुद्दा भाजपा आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित केला. त्यास उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, यातील फक्त १३०० मीटरचा रस्ता खराब आहे. त्यासाठी आपण निविदा काढली असून जिजाऊ कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने या जिजाऊ कंत्राटदाराकडून अनेक ठिकाणी कामे सुरु आहेत. मात्र त्याच्याकडून चांगली कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काम मिळाले नाही तर त्यांच्याकडूनच ठेकेदारांच्या संघटनेकडून आंदोलने करवून जातात. त्यामुळे पुन्हा त्यानाच कामे मिळतात. त्यामुळे त्या जिजाऊ कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टेड करणार का? असा सवाल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याच्या या उपप्रश्नाला उत्तर देताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी थेट विरोधी पक्षनेते अजित पवार यांना उद्देशून म्हणाले, राज्यातील अनेक भागात मोठ्या कंत्राटदानाकडून कामे घेतली जातात. त्यांच्याकडून एकाचवेळी कामेही सुरु असतात. परंतु दादा आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्ये असलेल्या ठेकेदारांनाही कामे द्यावी लागतात. त्यामुळे अनेक वेळा मोठ्या कंत्राटकारांना कामे मिळतात तर कार्यकर्त्यांना मिळत नाही. दादा याप्रश्नी आपल्याला एकदा सर्वांना एकत्र यावे लागेल. त्यावर निर्णय घ्यावा लागेल.

तसेच भिवंडी-पालघर या महामार्गावरून अवजड वाहने जात असल्याने तेथील रस्ता लवकर खराब होतो. त्या मात्र या रस्त्याच्या कंत्राटदार आणि पक्षिय कार्यकर्त्ये असलेल्या ठेकेदारांमध्ये सध्या अप्रत्यक्ष संघर्ष होत असल्याची एकप्रकारे कबुलीही दिली. तसेच रस्त्यांच्या कामाच्या वाटपासाठी एकच पोर्टल तयार करण्यात येईल. आणि त्या पोर्टलवरून कामांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच रस्ता झाल्यानंतर त्यावर पांढरी पट्टी मारावी लागेल. जेणेकरून रस्ता चांगला राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *