Breaking News

भास्कर जाधव म्हणाले, ईडी पुन्हा कोणाच्या कुटुंबाला त्रास देणार नाही

खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आता आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे निश्चित आहे. या निकाला नंतर उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाला निशाणा लक्ष करीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडयला सुरुवात झाली.
तर दुसरीकडे न्यायालयाने संजय राऊत यांना केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे ताशेरे ईडीवर ओढल्यानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपाचे नाव न घेता जोरदार फैरी झाडल्या आहेत.

खासदार राऊत यांना जामीन झाल्यानंतर ईडीने पुन्हा एकदा त्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र त्यानंतर ईडीची याचिका फेटाळून लावत संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळी ईडीवरही न्यायालयाने ताशेरे ओढले.

यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, न्यायालयाने ईडीवर ओढलेले ताशेरे बघून आता तरी पुढे ईडी अशा प्रकारची कोणाच्या कुटुंबाला त्रास होईल अशी कारवाई करणार नाही असा खोचक टोला लगावला.
संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यावर नेत्यांवर होणाऱ्या कारवाईबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ईडी कुणाच्या तरी दबावाखाली येऊन कोणालाही अटक करते आहे. त्यामुळे आम्हालाच नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मनात अटकेची भीती असल्याचे मत व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, फडणवीस हे कुणाच्या चुकीच्या बोलण्याचे समर्थन करत नाहीत, मात्र ते पाठीशी उभे राहतात, म्हणजे याचा अर्थ काय असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शिंदे गटातील मंत्री व आमदारांच्या बेताल वक्तव्याबद्दल बोलताना म्हणाले की, गुलाबराव पाटील आणि सत्तार यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या सुसंस्कृतपणाचा धाक होता. आता त्यांच्यावर कुणाचच धाक राहिला नाही, त्यामुळे ते अशी वक्तव्य करीत असतात असा टोलाही लगावला.

ईडीच्या कारवाई बद्दल बोलताना त्यांनी भाजपाच्या कुटील कारस्थाना बद्दल जोरदार टीका केली. भाजपाचा छोटे-मोठे प्रांतिक पक्ष संपवण्याच्या डाव नव्हे तर तसा कार्यक्रम असल्याचा आरोप त्यांनी केला.

बंडखोर आमदारांवर त्यांनी जोरदार टीका केली. त्यांच्याबद्दल सांगितले म्हणाले की, ४० आमदार गेले असेल तरी ४० हजार नव्या दमाचे कार्यकर्ते आमच्याकडे आले आहेत. त्यामुळे शिवसेनेला काहीच फरक पडला नाही असा विश्वासहीही यावेळी व्यक्त केला.

Check Also

फारूख अब्दुल्ला म्हणाले, पीओके बाबत राजनाथ सिंह यांना कोणी अडवलेय…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान ऑक्युपायड जम्मू काश्मीर अर्थात पीओके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *