Breaking News

शरद पवारांवरील त्या पोस्टप्रकरणी अखेर ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला घेतलं ताब्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केलं अभिनंदन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अंत्यत खालच्या पातळीवर टीका करत आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कळवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर ठाणे पोलिसांनी केतकी चितळेंच्या विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली असून ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबई येथून केतकी चितळे हिला दुपारी ताब्यात घेतलं. तसेच तिच्यावर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली. त्यांनी आपल्या ट्विटमधून केतकी चितळेला अटक केल्याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांचं अभिनंदन केले. गेल्या सात महिन्यांपासून केतकी कळंबोलीतील अव्हेलोन इमारतीत राहत आहे.

ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतची तक्रार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वप्नील नेटके यांनी दिली होती. महाराष्ट्रात आतापर्यंत केतकी चितळे विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. केतकी चितळेनं शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्यभरात राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून केतळी चितळेचा निषेध केला.

त्याचबरोबर नाशिक पोलिसांनी शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट लिहिणाऱ्या निखिल भामरे यास ही अटक केली आहे. त्याबद्दल आव्हाडांनी नाशिक पोलिसांचे अभिनंदन केले.

एकाबाजूला केतकी चितळेवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केलेली असली तरी त्या पोस्टच्या खाली नाव लिहिलेल्या अॅडव्होकेट नितीन भावे याच्याविरोधात पोलिस कधी कारवाई याबाबतही प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *