Breaking News

मुंबई

आर्यन खान प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार प्रभाकर साईलचा मृत्यू गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे चौकशीचे आदेश

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डीलिया क्रुझवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड स्टार शाहरूख खान पुत्र आर्यन खान यास अटक केली. मात्र ही कारवाई बनावट असल्याची माहिती उघडकीस आणणारा आणि या प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल याचा मृत्यू झाला. मात्र साईल याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरें म्हणाले, तर पोटदुखी होणाऱ्यांवर उपचार करावाच लागेल मराठीचा विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

महाराष्ट्रात मराठी भाषा शाळेत शिकवावी, दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कायदा करावा लागतो, ही वेळ का आली, ही विचार करण्याची गोष्ट असल्याचा सवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत मराठी भाषेत बोला, असे म्हटले की आमच्यावर टीका होते, मी टीकेला घाबरत नाही. टीका करणाऱ्यांची किंमत मला माहितीय मला त्याची काळजी नाही. पण जेव्हा आम्ही …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन होणाऱे “मराठी भाषा भवन” असे असणार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला ( २ एप्रिल २०२२) सकाळी अकरा वाजता होणार आहे. जवाहर बालभवन चर्नी रोड येथे होत असलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहरचे …

Read More »

अखेर मुंबई पालिकेने नारायण राणेंसमोर घेतली माघार, न्यायालयात दिला “हा” जबाब नोटीस मागे घेत असल्याची उच्च न्यायालयात माहिती

काही दिवसांपूर्वी अधिश बंगल्यातील अनधिकृत वाढीव बांधकाम प्रकरणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महापालिकेने नोटीस बजाविली. मात्र आता नोटीशीवरून मुंबई मोहापालिकेनेच घुमजाव करत सदरची बजावलेली नोटीस मागे घेत असल्याचा जबाबच मुंबई उच्च न्यायालयात दिला. त्यामुळे मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने राणेंच्या समोर सपशेल माघार घेत असल्याचे चित्र निर्माण झाले. …

Read More »

सीएनजी आणि पाईपलाईन गॅस वापरणाऱ्यांना दिलासा: १ एप्रिलपासून मिळणार स्वस्तात ‘सीएनजी’ वरील व्हॅट १३.५ ऐवजी आता ३ टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; १ एप्रिलपासून नवे दर

राज्याचा २०२२-२३ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सीएनजी गॅस वाहनधारक आणि पाईपलाईनद्वारे गॅसवरील व्हॅट दरात घट करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून सुरु करण्यात येत असून यासंबधीचे गॅजेटमध्ये प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी गॅस …

Read More »

ईडीची प्रताप सरनाईकांवर पुन्हा कारवाई: आतापर्यंत ३२५४ कोटींची मालमत्ता जप्त आज ११.३५ कोटींची संपत्ती जप्त

मागील काही महिन्यात मनी लॉड्रींग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सातत्याने धाडी टाकत त्यांची हजारो कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. तसेच याप्रकरणी ईडीकडून प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग यांची चौकशीही केली होती. त्यानंतर आज पुन्हा ईडीने कारवाई करत सरनाईक यांच्या ११.३५ कोटी रूपयांच्या दोन सदनिका जप्त करण्याची कारवाई …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेव्हण्यावर ईडीचा कारवाई, या गुन्ह्याखाली केली मालमत्ता जप्त ईडी म्हणते ६ कोटींची मालमत्ता जप्तः २०१७ साली झालेल्या गुन्हेप्रकरणी कारवाई

राज्यातील भाजपा आणि महाविकास आघाडीतील संबध भलतेच ताणले गेल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावून चौकशी केल्यानंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे तथा रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने धाड टाकत ६ सदनिका …

Read More »

ओसी नसलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी खुषखबर: सरकार आणणार नवा कायदा राज्य सरकार लवकरच नवा कायदा करणार- एकनाथ शिंदे

मुंबई शहरांमध्ये वाढत्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर इमारती उभारल्या जात आहेत. मात्र यातील अनेक इमारतींना रहिवाशी रहायला आल्यानंतरही वर्षानुवर्षे ओसी अर्थात भोगवटा प्रमाणपत्र मिळालेला नाही. त्यामुळे अनेक रहिवाशांना पाणी कर, मलनिस्सारण कर दुप्पट भरावा लागतो. विकासकाने न भरलेल्या करांमुळे रहिवाशांना हा नाहक त्रास सहन करावा लागत.  त्यामुळे अशा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना …

Read More »

एसटीप्रश्नी कर्मचाऱ्यांना फटकारत न्यायालयाची राज्य सरकारला १५ दिवसाची मुदतवाढ कामावर का परत जात नाही – न्यायालयाचा सवाल

चार महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दात नोंद घेत तुम्हाला कामावर परत जायला काय हरकत आहे असा सवाल एसटी कर्मचारी संघटनांना करत विलिनीकरणाबाबत अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी १५ दिवसात निर्णय घेण्याचे निर्देशही दिले. एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या …

Read More »

या ९७ पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलिस पदक २०२० सालच्या पोलिस पदकं सन्मानपूर्वक प्रदान

पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी (दि. २१ मार्च) समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. दहा पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके …

Read More »