Breaking News

मुंबई

चाकरमान्यांच्या पोटाची काळजी घेणाऱ्या डबेवाल्यांना मिळाले हक्काचे ‘भवन’ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक

बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. त्या नसा असतील तर मुंबईतील डबेवाले रक्त आहेत, अशा शब्दात पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील डबेवाल्यांच्या कार्याचे कौतुक केले. मुंबई महानगरपालिकेच्या शेरली, बांद्रा व्हिलेज, बांद्रा (पश्चिम) येथील समाज कल्याण केंद्राची २८६.२७ चौ. मी. क्षेत्रफळाची जागा मुंबई टिफिन बॉक्स …

Read More »

दिशा सालियन प्रकरणी पोलिस चौकशीला गेल्यानंतर नितेश राणेंनी केले “हे” ट्विट खेल आपने शुरू केला खत्म करेंगे असे सांगत ठाकरे सरकारला इशारा

दिशा सालियन प्रकरणी पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दिशाच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रांना चौकशीसाठी आज बोलावले. तेव्हा नितेश राणे यांनी स्वत: ड्रायव्हिंग करत एकाच गाडीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे हे …

Read More »

दिशा सालियनप्रकरणी न्यायालयाचा राणे पिता-पुत्रांना दिलासा १० मार्चपर्यंत अटक करता येणार नाही

सालियन कुटुंबाने केलेल्या तक्रारीच्या आधारे महिला आयोगाने दिलेल्या आदेशान्वये मालवणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु या गुन्ह्याच्या विरोधात राणे पिता-पुत्राने दिंडोशी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालये त्यांना १० मार्चपर्यंत अटक करता येणार नाही असे निर्देश देत संरक्षण …

Read More »

नवाब मलिकांना दिलासा नाहीचः ईडी कोठडीत वाढ ७ मार्च पर्यंत वाढविली

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी अंडरवर्ल्डशी संबधित आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींकडून जमिन खरेदी केल्याप्रकरणी आणि मनी लॉंडरींग प्रकरणी ईडीने अटक केली. याप्रकरणात त्यांना सुणावन्यात आलेली ईडी कोठडी आज ३ मार्च रोजी संपत आल्याने चौकशीसाठी आणखी काही दिवस त्यांना ईडी कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडी वकिलांनी केली. त्यानुसार त्यांना आणखी …

Read More »

महापालिका म्हणते, इमारतींच्या ओसी प्रकरणी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनाच वेळ नाही ८ महिन्यापूर्वी पत्र पाठवूनही कुलगुरुंचे मौन! मुंबई महापालिकेचा दावा

मुंबई विद्यापीठाच्या इमारतींच्या ओसी प्रकरणात कुलगुरु लक्ष देत नसल्याची बाब समोर आली आहे. ८ महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने कुलगुरु यांस पत्र पाठवूनही मुंबई विद्यापीठाने त्या पत्रास गांभीर्याने घेतले नाही, असा दावा मुंबई महानगरपालिकेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पाठविलेल्या पत्रात केला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली मागील २ वर्षांपासून ओसी प्रकरणाबाबत …

Read More »

राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून स्विकारला पदभार

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सेवानिवृत्त झाल्यापासून रिक्त असलेल्या राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी आता गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवास्तव यांनी राज्याचे प्रभारी मुख्य सचिव असलेल्या देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाचा पदभार आज स्विकारला. मनुकुमार श्रीवास्तव हे १९८६ च्या तुकडीचे …

Read More »

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे तर हेमंत नगराळे सुरक्षा मंडळाचे संचालक राज्य सरकारकडून बदलीचे आदेश जारी

फोन टॅपिंग प्रकरणात पोलिस महासंचालक पदाचा तात्पुरता कार्यभार असलेले संजय पांडे यांनी आपला अहवाल दिल्यानंतर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर राज्य सरकारने गुन्हा दाखल केला. त्यानंतर आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्णवेळ पोलिस महासंचालक पदावर राजीव सेठ यांची नियुक्ती राज्य सरकारने केली. त्यामुळे नाराज झालेल्या संजय पांडे यांनी सुट्टीवर जाण्याची …

Read More »

दक्षिण मुंबईचा बंद पडलेला वीज पुरवठा पुन्हा कसा सुरु झाला? वाचा सविस्तर ट्रॉम्बे वीजनिर्मिती केंद्रातील संच अतिरिक्त भारामुळे पडले होते बंद

तांत्रिक बिघाडामुळे रविवारी (दि.२७) दक्षिण मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा महापारेषणच्या प्रयत्नांमुळे तात्काळ पूर्ववत करण्यात आला. दुरुस्तीची कामे अवघ्या पाऊण ते एक तासात पूर्ण करण्यात आली. मेट्रो रेल्वेच्या कामामुळे काही वीजवाहिन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचदरम्यान पर्यायी वीज वाहिन्यांत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. ट्रॉम्बे येथील मुख्य ग्रहण केंद्रामधून …

Read More »

न्यायालय म्हणाले, लवासाबाबतच्या आरोपात तथ्य, पण आता उशीर झाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा त्यात रस होता मान्य

राज्यातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या पुणे जिल्ह्यातील लवासा प्रकरणाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने आपले महत्वपूर्ण निरिक्षण नोंदवित याचिका मात्र निकाली काढली. ही याचिका निकाली काढताना उच्च न्यायालय म्हणाले की, लवासा प्रकल्पाबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरील आरोपात तथ्य आहे. मात्र ही याचिका येण्यास उशीर झाल्याचे मत व्यक्त केले. तसेच …

Read More »

नाना पटोलेंच्या विरोधात प्रक्षोभक भाषेप्रकरणी माजी मंत्री बोंडेंच्या चौकशीचे आदेश माझगांव दंडाधिकाऱ्यांचे पोलिसांना आदेश चौकशी अहवाल सादर करा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल भाजपा नेते माजी कृषी मंत्री आमदार अनिल बोंडे, नागपूर पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार कृष्णा खोपडे, भाजपा युवा मोर्चा जालनाचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची दखल माझगाव महानगर दंडाधिकारी यांनी घेतली आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक …

Read More »