Breaking News

जयंत पाटील म्हणाले भाजपा म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ साधी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला

मुंबई: प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलन करणार्‍या भाजपला ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.

राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे अशा आशयाचे ट्वीट जयंत पाटील यांनी करत भाजप आंदोलनाची एकप्रकारे खिल्ली उडवली आहे.

अनुद्गार काढणं साध्वी प्रज्ञासिंग यांना शोभत नाही 

शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल अनुद्गार काढून भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग या महाराष्ट्राच्या अस्मितेला हात घालत आहेत. महाराष्ट्र ज्यांच्याबद्दल अभिमान बाळगतो त्यांच्याविषयी असे अनुद्गार काढणं साध्वी प्रज्ञासिंग यांना शोभत नाही अशा शब्दात त्यांनी सिंग यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

शहीद झालेल्या व्यक्तींबाबत अनुद्गार फक्त भाजपचे लोक आणि खासदारच काढू शकतात असा टोलाही त्यांनी लगावला.

ज्या जुन्या गोष्टी झाल्या नाहीत किंवा झाल्या नसाव्यात अशा गोष्टींचे खोटे आरोप करणे हे योग्य नाही. दुर्दैवाने चांगली संस्कृती आपण जपत नाही. टोकाची विधाने करून महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचे काम साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

केंद्रीय एजन्सीचा वापर करत देशमुख व मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न

केंद्रीय एजन्सीचा वापर करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही त्यांनी केला.

राज्यामध्ये मागच्या काळात अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल नोंदवले गेले होते. त्यांनी गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. त्या आरोपपत्राचा वापर करून किंवा बाहेरुन आरोप करुन अनिल देशमुखांना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्रीय एजन्सीकडून सुरू झाला असल्याचेही ते म्हणाले.

अनिल देशमुख यांच्यावर यापूर्वी सीबीआयने धाडी टाकल्या होत्या त्यात त्यांना काही सापडलं नाही. म्हणून आठ – दहा वर्षापूर्वीचं जुन्या गोष्टी उकरून काढून त्या त्रुटींवर बोट ठेवून अनिल देशमुख यांना पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न ईडीमार्फत होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Check Also

त्या हिंसक घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोल्हापूरः प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *