Breaking News

आरोग्य

कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील ५१.०५ लाख लोकांचे सर्वेक्षण पूर्ण फक्त ९९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाबाधीत रूग्णांच्या अनुषंगाने आतापर्यंत ५१.०५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सद्यपरिस्थितीत ११ हजाराहून अधिक सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले असून ९९७ कंटेनमेंट झोन सक्रिय असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात …

Read More »

मुंबई महानगराची वाटचाल १० हजाराकडे: नव्याने ७९० सापडले मुंबई-ठाणे मिळून ९ हजार ७०९ वर संख्या पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी दोनच दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १० हजारने ओलांडली असताना मुंबई आणि ठाणे मंडळ मिळून लवकरच ही संख्या ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्यात नव्याने ७९० रूग्ण आढळून आले असून राज्याची संख्या १२ हजार २९६ वर पोहोचली आहे. तर मुंबई शहरातील बाधितांची संख्या ८ हजार ३५९ वर …

Read More »

सोलापूरात ११४ वर संख्या पोहोचली ३२ पैकी २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह

सोलापूर: प्रतिनिधी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आज ३२ जणाचे पाठविण्यात आलेले अहवालापैकी २९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यापैकी ३ जण कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले असून आता रूग्णांची संख्या ११४ वर पोहोचली आहे. नव्याने बाधीत असलेले रूग्ण आकाशवाणी रोडवरील गवळी वस्ती येथील एक जण …

Read More »

ग्रीन झोनमधल्या नांदेडमध्येही आता कोरोना जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात!: पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड : प्रतिनिधी जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या अचानक २६ झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी भयभीत न होता अधिक खबरदारी बाळगावी, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. गेल्या आठवड्यापर्यंत नांदेडमध्ये एकही रूग्ण नव्हता आणि आज ही संख्या २३ ने वाढून २६ वर गेली. नांदेडमधील जुन्या ३ रूग्णांपैकी १ …

Read More »

राज्यात पहिल्यांदाच २४ तासात १००८ नवे रुग्ण एकूण संख्या ११ हजार ५०६ तर १८७९ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आज राज्यात सर्वाधिक १००८ रूग्णांचे निदान झाले असून गेल्या ५१ दिवसात एकादिवसात इतक्या रूग्णांचे निदान होण्याची ही पहिलीच वेळ असून १०६ जणांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली पोहोचली असून ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू …

Read More »

राज्यातील सर्वांवर मोफत उपचार : खाजगी रूग्णालयांच्या मनमानीस लगाम महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जनतेला आरोग्यदायी भेट

मुंबई: प्रतिनिधी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर करत राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना मुंबईतील काही …

Read More »

देशातील १० दिवसांपूर्वीच्या रूग्ण आकड्याशी राज्याची बरोबरी ५८३ नवे रूग्णांच्या निदानासह १० हजार ४९८ वर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आल्याने कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मागील २४ तासात राज्यात ५८३ नव्या रूग्णांचे निदान झाले असून एकूण संख्या १० हजार ४९८ वर पोहोचली. तर आज पुन्हा २७ जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत १७७३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याची माहिती राज्याचे …

Read More »

एकही रुग्ण तपासणी- उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत, उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज राज्य शासनामार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे …

Read More »

९ हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार करत राज्यात ३१ जणांचा मृत्यू मुंबई महानगराची संख्या ७ हजार २२३ वर

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊन, संचारबंदी आदी गोष्टींची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढच होत असून आज सर्वाधिक ३१ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात नव्याने ७२९ रूग्ण आढळून आले असून ९ हजार ३१८ वर संख्या …

Read More »

सोलापूरची संख्या ३ ने वाढत ६८ वर मात्र ते सारीचे रूग्ण एकाचा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सोलापूरातील कोरोना रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज ५८ जणाची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ३ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याने एकूण रूग्णांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतकांची संख्या ६ वर पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी …

Read More »