Breaking News

आरोग्य

सलग ६ व्या दिवशी १ हजाराहून अधिक रूग्ण २४ हजार ४२७ वर राज्याची संख्या: ५३ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णाची संख्या आज सलग सहाव्या दिवशी १ हजारने वाढली असून २४ तासात १ हजार २६ रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्याची रूग्णांची संख्या २४ हजार ४२७ वर पोहोचली असून ५३ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ५ हजार १२५ रूग्ण बरे होवून घरी गेल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश …

Read More »

दवाखाने बंद ? सरकारी रूग्णालयात गर्दी, मग ऑनलाईन ओपीडीत दाखवा आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या …

Read More »

सोलापूराची वाटचाल ३०० च्या दिशेने : ३ जणांचा मृत्यू ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह, २७५ वर पोहोचली संख्या

सोलापूर: प्रतिनिधी मुंबई, पुणे पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त्यांच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे. काल २० कोरोनाग्रस्तांचे निदान झाले होते. त्या तुलनेत आज ५० टक्के जरी संख्या कमी असली तरी ११ नव्या रूग्णांचे निदान झाल्याने २७५ वर रूग्णांची संख्या पोहोचली असून पुढील दोन-तीन दिवसात ३०० चा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तविण्यात …

Read More »

काल ४८ जणांचा तर आज ५३ रूग्णांचा मृत्यू राज्यात १५०० नवे रूग्ण संख्या २२ हजार १७१ वर पोहोचली

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. आज १२७८ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ४१९९ रुग्ण बरे झाल्याची माहिती देत काल ४८ जणांचा मृत्यू झाले होते. मात्र आज त्यात वाढ होवून ५३ जणांचा …

Read More »

सोलापूरात ४१ जणांना घरी सोडले मात्र नव्याने ४८ जणांची भर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सोलापूर: प्रतिनिधी जिल्ह्यातील ४१ कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होवून घरी गेल्याने एकप्रकारचे दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र दुसऱ्याबाजूला ४८ नव्या कोरोनाग्रस्त रूग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २६४ वर पोहोचल्याची माहिती मिलिंद शंभरकर यांनी दिली. रविवारी १३२ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ८४ जणांचे अहवाल नकारात्मक तर ४८ जणांचे …

Read More »

विदर्भातील ग्रीन झोनमधल्या जिल्ह्यात पहिला कोरोनाग्रस्त मृत्यूनंतर उघडकीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस

वर्धा: प्रतिनिधी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एक ३५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह. महिलेला शासकीय रुग्णालयात भरती होण्यासाठी नेत असताना मृत्यू. विनोबा भावे सावंगी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे ८ तारखेला त्यांचा स्त्राव घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझीटिव्ह आला. हिवरा तांडा गाव सील. आर्वीतील खाजगी रुग्णालय सुद्धा सील. तसेच …

Read More »

दोन महिन्यात २० हजार रूग्ण तर २४ तासात सर्वाधिक ४८ जणांचे मृत्यू मुंबई-ठाणे मंडळ १५ हजार ५९५ : दिवसभरात ३३० बरे होवून घराकडे

मुंबई: विशेष प्रतिनिधी साधारणत: दोन महिन्यापूर्वी अर्थात ९ मार्चला राज्यात पहिल्यांदा कोरोनाचे ४ रूग्ण आढळून आले होते. तेव्हापासून सातत्याने या संकेत वाढ असून आज दोन महिने पूर्ण होण्याच्या अर्थात ९ मे या दिवशी राज्याने २० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार पाडत २०,२२८ वर संख्या पोहोचली आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक मृत्यूही …

Read More »

सोलापूरने केला २०० चा टप्पा पार २१६ वर संख्या पोहोचली, मृतकांची संख्या १४ वर

सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज २०० चा टप्पा पार केला असून २१६ वर ही संख्या पोहोचली. आज २० रूग्णांची भर पाडली. आतापर्यंत मृतकांच्या संख्येतही वाढ झाली असून ही संख्या १४ वर पोहोचली. शहरातील शास्त्री नगरमध्ये ६, कुमठा नाका २, नई जिंदगी १, अशोक चौक १, एकता नगर २, निलम …

Read More »

राज्यात सलग ३ ऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक रूग्णांचे निदान ३७ जणांचा मृत्यू : रूग्ण १९ हजार पार एकूण संख्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून आता नागरिकांनीच काळजी घेण्याची आणि लॉकडाऊनचे नियम पाळत शाररीक अंतर राखण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात ६ तारखेला १२३३, ७ तारखेला १३६२ तर आज एक हजार ८९ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे या तीन दिवसात राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत एकदम ३५०० …

Read More »

कालचा विक्रम मोडत आज १३६२ रूग्णांची वाढ राज्याची संख्या १८ हजारावर पोहोचली

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनोग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याच्या संख्येत आजही खंड पडलेला नाही. काल १२३३ रूग्ण आढळून आले होते. त्यात आज १४० ने वाढ होत ही संख्या १३६२ वर पोहोचली असून राज्यातील रूग्णांची संख्याही १८ हजार पार पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सामाजिक माध्यमातून संवाद साधताना …

Read More »