Breaking News

आरोग्य

आता कोरोना चाचणी २२०० रूपयांत होणार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे जाहीर केले. …

Read More »

कोरोना : तीन लाखापैकी १ लाख रूग्ण महाराष्ट्रात तर मृतकांची संख्या ४ हजाराकडे ३४९३ नवे रूग्ण तर १२८ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज संख्येने देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रूग्णांची नोंद करत १ लाख रूग्णांचा रेकॉर्डब्रेक तयार केला. संपू्र्ण देशभरात एकूण रूग्णांची संख्येने ३ लाख रूग्णांचा टप्पा पार केला आहे. त्यातील एक लाख रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशीही राज्यात ३ हजार ४९३ रूग्णांचे निदान झाले …

Read More »

कोरोना: लागोपाठ दुसऱ्यादिवशी सर्वाधिक रूग्ण आणि मृतकांची नोंद १५२ जणांचा मृत्यू तर ३ हजार ३६०७ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी काल सर्वाधिक रूग्ण आणि मृतकांची नोंद झाल्यानंतर आज सलग दुसऱ्यादिवशी १५२ जणांच्या मृत्यूची नोंद तर ३ हजार ६०७ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रूग्णसंख्या ९७ हजार ६७८ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४७ हजार ९६८ वर पोहोचली आहे. आज झालेल्या मृतकांच्या संख्येत सर्वाधिक रूग्ण …

Read More »

रिकव्हरी रेट ५० टक्क्यावर मात्र मुंबईमध्ये नव्याने ५०० आयसीयू बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या बरे होण्याच्या दरात वाढ झाली असून हा दर आता ५० टक्केवर पोहोचला आहे. तसेच मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहता अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. जळगाव येथील बाधीत …

Read More »

१० दिवसात २ ऱ्यांदा राज्यात सर्वाधिक मृत्यू आणि रूग्णांची नोंद १४९ मृतकांची आणि ३ हजार २५४ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी जून महिना सुरु होवून आज अवघे १० दिवस पूर्ण होत असतानाच या दिवसांमध्ये तब्बल दोन वेळा सर्वाधिक मृत्यू आणि रूग्ण संख्येची नोंद झाली. मात्र एकाच दिवशी विक्रमी मृतकांची संख्या आणि रूग्णांच्या संख्येची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ असून आज ३ हजार २५४ इतक्या नव्या रूग्णांची तर १४९ जणांचा …

Read More »

कोरोना: ४ दिवसांच्या अंतराने राज्य ९० हजारावर मात्र अॅक्टीव्ह रूग्ण ४५ हजाराच्या जवळ १२० जणांचा मृत्यू तर २२५९ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८० हजारावर पोहोचल्यानंतर ४ च दिवसात १० हजाराने रूग्णसंख्येत वाढ होत ही संख्या ९० हजार ७८७ वर पोहोचला. मात्र अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४४ हजार ८४९ वर पोहोचली. राज्यात आज पुन्हा १२० रूग्णांच्या मृत्यूची नोंद होत २२५९ नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर १६६३ जण बरे …

Read More »

कोरोनावर आता युनानी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योग चिकित्सा उपचार पध्दती वापरा केंद्राच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता या आजारावर उपचार करण्यासाठी युनानी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि योग चिकित्साच्या उपचार पध्दतीला राज्य सरकारने मान्यता दिली. यासंदर्भातील एका आदेशही राज्य सरकारने आज रात्रो उशीरा जारी केला. सामान्य प्रतिबंधात्मक उपाय १) वैयक्तिक स्वच्छेतेचे व्यवस्थित पालन करावे. २) वारंवार साबणाने …

Read More »

कोरोना: राज्यातील २५५३ संख्येसह मुंबई पोहोचली ५० हजारावर : रिकव्हरी रेट वाढला राज्यात १०९ जणांचा मृत्यू तर मुंबई-ठाण्यात आतापर्यंत २१३४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यात २५५३ नव्या कोरोनाग्रस्तांची आणि १०९ जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. राज्यातील एकूण बाधीतांची संख्या ८८ हजार ५२८ वर पोहोचली असून यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४४ हजार ३७४ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील एकूण रूग्णसंख्येपैकी ५० हजार ८५ तर मुंबई महानगरात २१३४ जणांचा आतापर्यत मृत्यू झाल्याची …

Read More »

कोरोना: सर्वाधिक रूग्णांची नोंद होत एकूण संख्या ४३ हजारावर ९१ जणांचा मृत्यू , १९२४ जण बरे होवून घरी गेले

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आतापर्यत कोरोनाग्रस्त रूग्ण संख्या अर्थात ३ हजार ७ रूग्णाची नोंद झाली असून मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ८५ हजार रूग्णसंख्येचा टप्पा पार केला आहे. तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ४३ हजार ५९१ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर २४ तासात १९२४ …

Read More »

सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यात ८० रूग्ण ११ तालुक्यात ६ तर शहरातील मृतकांची संख्या १०१ वर

सोलापूर : प्रतिनिधी शहरातही कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्यात वाढत असताना या आजाराचे लोण आता ग्रामीण भागातही हळूहळू पसरत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यत जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ८० रूग्ण आढळून आले आहे. तर यापैकी ६ जणांचा मृत्यू तर ६ जण बरे झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११६० …

Read More »