Breaking News

कोरोना: ४ दिवसांच्या अंतराने राज्य ९० हजारावर मात्र अॅक्टीव्ह रूग्ण ४५ हजाराच्या जवळ १२० जणांचा मृत्यू तर २२५९ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८० हजारावर पोहोचल्यानंतर ४ च दिवसात १० हजाराने रूग्णसंख्येत वाढ होत ही संख्या ९० हजार ७८७ वर पोहोचला. मात्र अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४४ हजार ८४९ वर पोहोचली. राज्यात आज पुन्हा १२० रूग्णांच्या मृत्यूची नोंद होत २२५९ नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर १६६३ जण बरे झाले असून ४२ हजार ३६८ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४६.९६ % एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर – ३.६ %. सध्या राज्यात ५,६८,०७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,९३० खाटा उपलब्ध असून सध्या २६,४७० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८० पुरुष तर ४० महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६२ रुग्ण आहेत तर ४७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ९१ जणांमध्ये ( ७५.८ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२८९ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ११ मे ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७१ मृत्यूंपैकी मुंबई ४५, ठाणे -११,मीरा भाईंदर -६, औरंगाबाद – ३, पनवेल -२, नाशिक -१, रत्नागिरी -१, वसई विरार -१ व इतर राज्यातील १ मृत्यू असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ८३ मुंबई -५८, ठाणे -१३, मीरा भाईंदर – ६, पनवेल -३, वसई विरार -२,नवी मुंबई -१.
नाशिक  नाशिक -३
पुणे १८ पुणे  -१६, सोलापूर -२
कोल्हापूर रत्नागिरी -१
औरंगाबाद १० औरंगाबाद – १०
अकोला अकोला -२, अमरावती -१.
नागपूर नागपूर -१
इतर राज्ये मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू नागपूरमध्ये झाला आहे.

 

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ५११०० २२९४३ १७६० २६३९१
ठाणे १४०६३ ५२१८ ३५५ ८४८९
पालघर १६३६ ६०८ ४३ ९८५
रायगड १५०० ९२६ ५८ ५१४
नाशिक १६६० १०९४ ९५ ४७१
अहमदनगर २१० १२१ ८०
धुळे २९० १२९ २५ १३५
जळगाव ११४९ ५१६ ११५ ५१८
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ४० २८
१० पुणे १००७३ ५९०३ ४२९ ३७४२
११ सोलापूर १४६८ ६२७ ११२ ७२९
१२ सातारा ६५८ ३५९ २७ २७२
१३ कोल्हापूर ६७० ४३० २३२
१४ सांगली १८० ९५ ८१
१५ सिंधुदुर्ग १३० ३१ ९९
१६ रत्नागिरी ३७८ १८७ १४ १७७
१७ औरंगाबाद २०८५ १२७१ ११० ७०४
१८ जालना २०९ १३१ ७३
१९ हिंगोली २१४ १६८ ४६
२० परभणी ७८ ५० २५
२१ लातूर १३९ ११२ २३
२२ उस्मानाबाद १२५ ७४ ४८
२३ बीड ६३ ४६ १६
२४ नांदेड १७१ ११३ ५०
२५ अकोला ८४८ ४४७ ३८ ३६२
२६ अमरावती ३०३ २०० १९ ८४
२७ यवतमाळ १६४ ११६ ४६
२८ बुलढाणा ९७ ५४ ४०
२९ वाशिम १२
३० नागपूर ७८८ ४७८ १२ २९८
३१ वर्धा ११
३२ भंडारा ४२ २४ १८
३३ गोंदिया ६८ ६७
३४ चंद्रपूर ४२ २६ १६
३५ गडचिरोली ४५ ३४ ११
  इतर राज्ये /देश ७८ २० ५८
  एकूण ९०७८७ ४२६३८ ३२८९ ११ ४४८४९

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *