Breaking News

आरोग्य

कोरोना: बरे होण्याचे प्रमाण वाढले तरी मृत आणि नव्या रूग्णांच्या संख्येत वाढच ३८२७ नवे रूग्ण तर १४२ जणांचा मृत्यू, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५५ हजार वर

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या बरे होण्याच्या संख्येत चांगल्यापैकी वाढ होत असली तरी दैंनदिन मृतकांच्या आणि रूग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविणे अवघड बनत चालले आहे. मागील २४ तासात १४२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली तर नवे ३ हजार ८२७ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५५ हजार ६५१ वर …

Read More »

कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर रोखण्यासाठी आता ‘टेलीआयसीयु’ तंत्रज्ञान मुंबईसह राज्यात सात जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर वापरणार असल्याची आरोग्यमंत्री टोपेंची माहिती

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचे वाढत असलेल्या मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयु) उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ‘टेलीआयसीयु’ सुविधेचा वापर केला जणार असून मुंबई, ठाणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, अकोला आणि जालना या ७ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर …

Read More »

मुंबईच्या धर्तीवर डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा पण मृत्यू दर रोखा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाशी आपण ३ महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यू दर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण सापडविणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरीत्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे , …

Read More »

कोरोना: कालच्यापेक्षा मृतकांची संख्या कमी मात्र रूग्ण संख्येत वाढ ३ हजार ७५२ नव्या रूग्णांचे निदान तर १०० मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्याठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरु असून त्याचाच परिणाम आजच्या मृतकांच्या संख्येवर दिसून येत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला नव्या रूग्णांची संख्या मात्र वाढताना दिसत असून आज ३७५२ रूग्ण आढळून आले. तर १०० मृतकांची नोंद झाली आहे. तर १६७२ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने …

Read More »

कोरोना: बरे होणाऱ्यांच्या संख्येत मोठी प्रगती तर नव्या रूग्णांच्या संख्येत वाढ ३३०७ नवे रूग्ण, ११४ जणांचा मृत्यू तर ५१ हजारावर अॅक्टीव्ह रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात राज्याच्या आरोग्य यंत्रणेला यश असल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला बाधीत रूग्णांची संख्याही दिवसागणिक कमी-जास्त होत असल्याने नवे रूग्णही संख्येने आढळून येत आहेत. मागील २४ तासात ३३०७ नव्या रूग्णांचे निदान तर ११४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज १३१५ जण बरे होवून …

Read More »

कोरोना चाचणीसाठी लॅबमध्ये जाताय तर मग २५०० रूपयेच द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून नवी दर आकारणी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने २२०० व २८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपये न आकारता त्यांच्याकडून २५०० रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. तसेच मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० …

Read More »

बीकेसी- ठाण्यात कमी दिवसात उभारले हजार खाटाचे कोविड रूग्णालय आरोग्य सुविधा उभारणीची महाराष्ट्राने देशासमोर मांडली यशोगाथा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या उपायोजनांसाठी आरोग्य सुविधांची उभारणी करताना मुंबईत मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेडस् निर्माण करण्याची किमया यंत्रणांनी केली. महाराष्ट्राने देशासमोर अभिनव अशी यशोगाथा मांडल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे काढले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यावतीने बीकेसी मैदानावर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या …

Read More »

कोरोना: अबब..१६ जून पर्यंत राज्यात ५ हजार ५०० हून अधिक मृत्यू अॅक्टीव्ह रूग्ण ५० हजारावर तर बरे होवून घरी गेले ५७ हजार

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्य सरकार मृतकांचा किंवा रूग्णाच्या आकडेवारी लपवित असल्याची चर्चा दबक्या आवाजात सरकार दरबारी सुरु होती. त्याची परिणती अखेर याविषयीची माहिती प्रसारमाध्यमात आणि विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने आतापर्यतची आणि फेरतपासणीत आढळून आलेल्या आकडेवारीनुसार ९ मार्च पासून ते १६ जून पर्यत ५ हजार ५३७ जणांचा मृत्यू …

Read More »

सरकारची अखेर कबुली : फेरतपासणीत मुंबईत ८६२ तर राज्यात ४६६ मृत्यू सापडले मुख्य सचिव अजोय मेहता यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधीतांचे मृत्यूची आकडेवारी लपविली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रसारमाध्यमातूनही ही माहिती उघडकीस आली. त्यावर अखेर राज्य सरकारने यावर खुलासा देत मुंबईत ८६२ तर राज्यात ४६६ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी राहीली असल्याचे सांगत ही आकडेवारी फेरतपासणीत पुढे आल्याचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता …

Read More »

ICMR चा सिरो सर्व्हे म्हणतो, महाराष्ट्रात कोरोनाचा अत्यल्प संसर्ग सहा जिल्ह्यात १.१३ टक्के रूग्णांचे प्रमाण

मुंबई : प्रतिनिधी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे ( आय सी एम आर ) गेल्या महिन्यात देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझीटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.१३ एवढे आढळून आले आहे. …

Read More »