Breaking News

१० दिवसात २ ऱ्यांदा राज्यात सर्वाधिक मृत्यू आणि रूग्णांची नोंद १४९ मृतकांची आणि ३ हजार २५४ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी
जून महिना सुरु होवून आज अवघे १० दिवस पूर्ण होत असतानाच या दिवसांमध्ये तब्बल दोन वेळा सर्वाधिक मृत्यू आणि रूग्ण संख्येची नोंद झाली. मात्र एकाच दिवशी विक्रमी मृतकांची संख्या आणि रूग्णांच्या संख्येची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ असून आज ३ हजार २५४ इतक्या नव्या रूग्णांची तर १४९ जणांचा मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ९४ हजार ४१ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची ४६ हजार ७४ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तसेच आज १८८९ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ४४ हजार ५१७ इतकी झाली आहे. यापूर्वी ६ जून रोजी सर्वाधिक १३९ जणांच्या मृत्यूची नोंद तर ७ जून रोजी ३ हजार ७ नव्या रूग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे मागील १० दिवसात दुसऱ्यांदा सर्वाधिक रूग्ण आणि मृतकांची नोंद झाली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४७.३४ % एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर – ३.६५ %. सध्या राज्यात ५,६९,१४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,७२७ खाटा उपलब्ध असून सध्या २७,२२८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मृत्यू राज्यात १४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू खालील प्रमाणे आहेत –

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे १२२ मुंबई -९७, ठाणे -१५, नवी मुंबई -५, उल्हासनगर -३, वसई विरार -२.
नाशिक  जळगाव – ५
पुणे १० पुणे  -१०
औरंगाबाद औरंगाबाद – ७
लातूर बीड – १
अकोला अकोला -२, अमरावती -१.
नागपूर गडचिरोली  -१

राज्यात आज रोजी एकूण ४६,०७४  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हा निहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ५२६६७ २३६९४ १८५७ २७१०९
ठाणे १४७२० ५७०६ ३७८ ८६३५
पालघर १७३८ ६४५ ४५ १०४८
रायगड १५७५ ९८१ ५८ ५३४
नाशिक १७०४ ११३० ९५ ४७९
अहमदनगर २२० १३९ ७२
धुळे ३३४ १३५ २५ १७३
जळगाव १२८८ ५६९ १२० ५९९
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ४४ २८ १२
१० पुणे १०४०६ ६०७९ ४३९ ३८८८
११ सोलापूर १४८३ ६५४ ११२ ७१७
१२ सातारा ६८१ ३६१ २७ २९३
१३ कोल्हापूर ६७१ ४७० १९३
१४ सांगली १८८ १०६ ७८
१५ सिंधुदुर्ग १३३ ५१ ८२
१६ रत्नागिरी ३८१ १९१ १४ १७६
१७ औरंगाबाद २१७३ १२८३ ११७ ७७३
१८ जालना २२५ १४८ ७२
१९ हिंगोली २१४ १७९ ३५
२० परभणी ८० ५८ १९
२१ लातूर १४७ ११८ २५
२२ उस्मानाबाद १४० ८३ ५४
२३ बीड ६३ ४६ १५
२४ नांदेड १७४ ११३ ५३
२५ अकोला ८८२ ४९७ ४० ३४४
२६ अमरावती ३०५ २१० २० ७५
२७ यवतमाळ १६८ ११७ ३९
२८ बुलढाणा ९८ ५६ ३९
२९ वाशिम १४
३० नागपूर ८३१ ४९५ १२ ३२४
३१ वर्धा १४
३२ भंडारा ४२ ३१ ११
३३ गोंदिया ६८ ६७
३४ चंद्रपूर ४५ २६ १९
३५ गडचिरोली ४५ ३७
  इतर राज्ये /देश ८० २० ६०
  एकूण ९४०४१ ४४,५१७ ३४३८ १२ ४६०७४

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *