Breaking News

मंकीपॉक्स आजाराबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, देशात आणि महाराष्ट्रात एकही… घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्टोक्ती

मागील काही दिवसांपासून आंतराराष्ट्रीयस्तरावर मंकीपॉक्स आजाराचे रूग्ण आढळून येत असल्याचे वृत्त सातत्याने पुढे येत आहे. त्यामुळे कोरोनानंतर या आजाराचा प्रादुर्भाव राज्यात होणार की काय असा संभ्रम राज्यातील जनतेत झाला. त्यामुळे चिंतेचेही वातावरण निर्माण झाले. यापार्श्वभूमीव राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलासा दिला. तसेच महाराष्ट्रात किंवा देशात एकही रूग्ण नसल्याचे सांगत घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले.

मंकीपॉक्सचे एकही प्रकरण महाराष्ट्रात किंवा भारतात नाही. त्यामुळे मंकीपॉक्सचे कुठलेही भय मनात ठेवायचे कारण नाही. खबरदारी म्हणून आपण विमानतळांवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची मेडिकल स्क्रिनिंग करत आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे बुधवारी जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता माध्यमांशी बोलत होते.

राजेश टोपे म्हणाले, राज्यामधील ३६ जिल्ह्यांपैकी मुंबई आणि पुणे इथे करोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. एकूण साडेतीन हजाराच्या आसपास सक्रीय रूग्ण सध्या राज्यामध्ये आहेत. त्यातील अडीच हजार रूग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आहेत. रूग्णालयात रूग्ण दाखल होण्याच्या संख्येमध्ये मात्र वाढ दिसत नाही. तसेच रूग्णालयांमध्ये रूग्णांची भर्ती मोठ्या प्रमाणात होत नसल्याने सध्यातरी जम्बो कोविड सेंटरची आवश्यकता नाही.

पावसाळ्यात साथीचे रोग वाढतात. कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी पाणी साचलेले दिसते. त्या साचलेल्या पाण्यात मच्छरांची पैदास होते. ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे, तेथील नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, अशा सूचना आरोग्य विभागातून नेहमीच दिल्या जातात असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *