Breaking News

१५ दिवसात दुसऱ्यांदा विक्रमी रूग्ण : मुंबई महानगर पोहोचले २० हजारावर १८२२ रूग्णांचे निदान तर ४४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून जंगजंग पछाडायला सुरुवात केलेली आहे. तरीही करोनाचा विषाणू काही आटोक्यात यायला तयार नसून मागील १५ दिवसात दुसऱ्यांदा १८२२ कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्याची संख्या २७ हजारावर तर मुंबई महानगराची संख्या २० हजारावर पोहोचली असून राज्यात ४४ जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मागील ८ दिवसात राज्याने १० हजाराचा टप्पा पार केला. तसेच साधारणत: २ मे रोजी राज्यात १९०० कोरोनाबाधीत रूग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर आज थेट १८२२ रूग्ण आढळून आले. त्यामुळे राज्याची संख्या २७ हजार ५२४ तर मुंबई महानगराची संख्या २० हजार ४४१ वर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
मृत्यू –आज राज्यात ४४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २५, नवी मुंबईत १०, पुण्यात ५, औरंगाबाद शहरात २, पनवेलमध्ये १ तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीमध्ये झाला आहे. नवी मुंबईत आज नमूद करण्यात आलेले मृत्यू दिनांक १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत.
मृत्यूंबद्दल अधिकची माहिती –आज झालेल्या मृत्यूंपैकी ३१ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ४४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ४४ रुग्णांपैकी ३४ जणांमध्ये ( ७७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १०१९ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,४०,१४५ नमुन्यांपैकी २,१२,६२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २७,५२४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना – राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,२५३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५९.०४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे –
1. आजपर्यंत राज्यातून ६०५९ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
2. सध्या राज्यात ३,१५,६८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५,४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       १६७३८ ६२१
ठाणे           १६६
ठाणे मनपा १२१५ ११
नवी मुंबई मनपा १११३ १४
कल्याण डोंबवली मनपा ४२४
उल्हासनगर मनपा ८२
भिवंडी निजामपूर मनपा ३९
मीरा भाईंदर मनपा २४८
पालघर ४२
१० वसई विरार मनपा २९५ ११
११ रायगड १६६
१२ पनवेल मनपा १६१
  ठाणे मंडळ एकूण २०६८९ ६८१
१३ नाशिक ९८
१४ नाशिक मनपा ६०
१५ मालेगाव मनपा ६४९ ३४
१६ अहमदनगर ५५
१७ अहमदनगर मनपा १५
१८ धुळे
१९ धुळे मनपा ६२
२० जळगाव १७१ २२
२१ जळगाव मनपा ५२
२२ नंदूरबार २२
  नाशिक मंडळ एकूण ११९३ ७१
२३ पुणे १८२
२४ पुणे मनपा २९७७ १६६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५५
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा ३३५ २०
२८ सातारा १२५
  पुणे मंडळ एकूण ३७८३ १९८
२९ कोल्हापूर १९
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ३६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग
३४ रत्नागिरी ८३
  कोल्हापूर मंडळ एकूण १५८
३५ औरंगाबाद ९५
३६ औरंगाबाद मनपा ६२१ १९
३७ जालना २०
३८ हिंगोली ६१
३९ परभणी
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण ७९९ २०
४१ लातूर ३२
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा ५२
  लातूर मंडळ एकूण ९४
४७ अकोला १८
४८ अकोला मनपा १९० ११
४९ अमरावती
५० अमरावती मनपा ८७ ११
५१ यवतमाळ ९९
५२ बुलढाणा २६
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ४२८ २६
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ३२९
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
  नागपूर एकूण ३३९
  इतर राज्ये ४१ १०
  एकूण २७५२४ १०१९

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *