Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दिलासा २९ व ३० डिसेंबर रोजी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे धनंजय मुंडे यांचे समित्यांना निर्देश

पुणे: प्रतिनिधी
ग्राम पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडालेली असताना, जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे आज २९ डिसेंबर व उद्या ३० डिसेंबर असे दोनही दिवस राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारावेत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
मुंडे यांच्या निर्देशानुसार बार्टीमार्फत याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आली असल्याने ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत याबाबत राज्यभरातून विनंती व तक्रारी करणारे फोन मेसेज येत होते. त्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची पोहोच पावती मिळावी, गैरसोय होऊ नये याकरीता २९ व ३० डिसेंबर असे दोन दिवस अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ठिकठिकाणी समितीने अर्जाची संख्या लक्षात घेत अर्ज स्वीकारण्याची खिडकी/कक्ष वाढवावेत व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे. या दोन्ही दिवशी आलेले सर्व अर्ज दाखल करेपर्यंत कार्यालय सुरू ठेवावीत तसेच ऑफलाईन दाखल केलेल्या अर्जाची माहिती ०१ जानेवारी पर्यंत बार्टीकडे लेखी स्वरूपात कळवावी असे आदेश राज्यातील सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *