Breaking News

स्टार हेल्थचा आयपीओ ३० नोव्हेंबरला खुला, प्रती शेअर ‘इतकी’ असेल किंमत ८७० ते ९०० राहणार किंमत

मुंबईः प्रतिनिधी
स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी उघडणार असून तो २ डिसेंबर रोजी बंद होईल. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स १० डिसेंबर रोजी शेअर बाजाराता सूचीबद्ध केले जातील. आयपीओद्वारे स्टार हेल्थ ७,५०० कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओमध्ये प्रती शेअर किंमत ८७० ते ९०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
सध्या देशात ३० विमा कंपन्या सूचीबद्ध आहेत. यामध्ये SBI Life, HDFC Life, New India Assurance, ICICI Prudential Life, GIC आणि ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स यांचा समावेश आहे. स्टार हेल्थचा आयपीओ हा या वर्षातील तिसरा सर्वात मोठा आयपीओ असेल. आयपीओतून या वर्षात पेटीएमने १८,३०० रुपये आणि झोमॅटोने ९,३७५ कोटी रुपये उभे केले आहेत.
मात्र, बाजारातील वातावरण पाहता कंपनीच्या इश्यूला चांगला प्रतिसाद मिळणे कठीण जात आहे. त्याचा परिणाम मंगळवारी सूचीबद्ध झालेल्या लेटेंट व्ह्यूच्या शेअर्सवर दिसून आला. लेटेंट व्ह्यूचे शेअर्स १६८% वर सूचीबद्ध झाले, परंतु नंतर ते ९% पर्यंत खाली आले. स्टार हेल्थचे मूल्यांकन अंदाजे ५१ हजार कोटी रुपये आहे. ही खाजगी क्षेत्रातील कंपनी आहे. यापूर्वी याच क्षेत्रातील कंपनी पॉलिसी बाजारात या महिन्यात सूचिबद्ध झाली होती. त्याचे मूल्य ५९,८२४ कोटी रुपये आहे.
बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची स्टार हेल्थमध्ये १७.२६% हिस्सेदारी आहे. कंपनी नवीन शेअर्सद्वारे २,००० कोटी रुपये उभारेल, तर ५,५०० कोटी रुपये विक्रीसाठी ऑफर केले जातील. म्हणजेच विद्यमान प्रवर्तक आणि भागधारक त्यांचा हिस्सा विकतील. सध्या कंपनीतील प्रवर्तकांची भागीदारी ६२.८०% आहे.
स्टार हेल्थ इन्शुरन्सचा बाजारातील हिस्सा ३१% आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या एकूण प्रीमियममध्ये ३१.४% वाढ झाली आहे. तर रिटेल प्रीमियमचा वाटा ३२.४% आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये त्याचा एकूण प्रीमियम ९.३४९ कोटी रुपये होता. FY20 मध्ये प्रीमियम ६,८९१ कोटी रुपये होता. त्याच वर्षी कंपनीला २७२ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर २०२१ मध्ये तोटा ८२६ कोटी रुपये होता.
आतापर्यंत सूचिबद्ध झालेल्या बहुतांश स्टार्टअप्स तोट्यात आहेत. झोमॅटोपासून पॉलिसीबाजार आणि पेटीएमपर्यंत सर्वच कंपन्या तोट्यात आहेत. Nykaa ने आर्थिक वर्ष २१ मध्ये नफा दाखवला असला तरी त्यापूर्वी ती तोट्यातही होती. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचा नफा केवळ १ कोटी रुपये होता.

Check Also

हिंदूस्थान युनिलिव्हर लिमिटेडकडून डिव्हीडंड जाहिर नफा २ टक्क्याने घसरला

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने बुधवारी चौथ्या तिमाहीत (Q4 FY24) नफ्यात घट नोंदवली. “(मार्च २०२४) तिमाहीत रु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *