Breaking News

मोदींचे डिलीट केलेले “ते” ट्विट आणि अर्थमंत्र्यांची अधिकृत घोषणा अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी केली डिजीटल करन्सीचा स्विकारण्याचा निर्णय

मराठी ई-बातम्या टीम

काही महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भल्या सकाळी ट्विट करण्यात आले. आणि ते ट्विट बघता बघता संपूर्ण भारतासह जगभरात व्हायरल झाले. मात्र त्यावरून उमटणाऱ्या संभावित टीका-टिपण्णीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी गोची पाहून अखेर ते डिलीट करण्यात आले. तरीही त्याचे स्क्रिन शॉट्स व्हायरल झालेच. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे अकाऊंट कॉम्प्रमाईज झाल्याचा खुलासा पंतप्रधान कार्यालयाकाडून जारी करण्यात आला. परंतु आज तर चक्क डिजीटल करन्सीला मान्यता देत रिझर्व्ह बँक डिजीटल करन्सी काढणार असल्याची घोषणाच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प मांडताना जाहीर करत पंतप्रधानांचे ते ट्विट म्हणजे निर्णयच होता असे अप्रत्यक्ष जाहिर करून टाकले.

आंतरराष्ट्रीयस्तरावर अनेक देशांकडून क्रिप्टो करन्सीला मान्यता देण्यात येत असताना भारत सरकारने मात्र क्रिप्टो करन्सीला मान्यता न देण्याचे धोरण स्विकारत त्यासंबधीचे कडक नियम केले. त्यानुसार देशात क्रिप्टो करन्सीमधून व्यवहार होण्यास बंदी आली. मात्र  साधारणत: दुसरी लाट ओसरल्यानंतर केंद्र सरकारने अनेक गोष्टी खुल्या केल्या. त्यानंतर एके दिवशी भल्या सकाळी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून क्रिप्टो करन्सीला मान्यता देत असल्याचे जाहिर करण्यात आले. परंतु त्याबाबत वादंग निर्माण होण्याचा अवकाश होता की, तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाऊंटवरून ते ट्विट डिलीट करण्यात आले. तसेच त्या संदर्भातील माहिती ट्विटरला तात्काळ कळविण्यात आली. दरम्यान पंतप्रधान कार्यालयाने सदरचे ट्विट हे अकाऊंट कॉम्प्रामाईज झाल्यामुळे झाल्याचे जाहीर खुलासा करण्यात आला.

परंतु ते ट्विट कोणी कॉम्प्रामाईज केले? कधी केले, कसे झाले याची कोणतीही अधिकृत माहिती त्यानंतर कधीच जनतेसमोर आली नाही. आणि त्याबाबतची माहितीही कोणी विचारली नाही. मात्र आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडताना डिजीटल करन्सीला मान्यता देत भारताचीही डिजीटल करन्सी निर्माण करण्यात येणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ते प्रसिध्द झालेले आणि नंतर डिलीट केलेले ट्विटच त्यावेळी घेतलेला निर्णय होता हे ही केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यांनी अप्रत्यक्ष सांगून टाकले.

मोदींचे हेच ते डिलीट केलेले ट्विट:-

Check Also

अक्षयतृतीयेच्या तोंडावर सोने दरात घसरण भारतीय सोने बाजारावर काळजीचे वातावरण

इराण आणि इस्रायल या दोघांनी अतिरिक्त ड्रोन हल्ल्यांपासून दूर राहिल्यामुळे आठवड्याच्या शेवटी पश्चिम आशियातील तणाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *