Breaking News

देशाचा अर्थसंकल्प सादर होणार या तारखेला: मात्र अधिवेशन दोन टप्प्यात संसदेकडून वेळापत्रक जाहीर

मराठी ई-बातम्या टीम

संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोनाने उचल खाण्यास सुरु केल्यानंतर देशभरातील अनेक राज्यांनी आटोपशीर हिवाळी अधिवेशन घेतले. यापार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन घेतले जाणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आज अखेर संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२२ रोजी संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामण या सादर करणार आहेत.

संसदेने जाहीर केलेल्या तारखानुसार नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे २५६ वे अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात ८ एप्रिल पर्यंत चालणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत अधिवेशन चालणार आहे. तर दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिल पर्यंतचा असणार आहे. याशिवाय १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

याआधी सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षित संचालनसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यसभेचे पदसिध्द सभापती आणि लोकसभा अध्यक्ष या दोघांनी सेक्रेटरी-जनरल यांना सद्य परिस्थितीत मागील हिवाळी अधिवेशनातील कोविड प्रोटोकॉलचा आढावा घेण्याचे आणि या संदर्भात लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होत आहे. यामध्ये राष्ट्रपतींचे अभिभाषण होते आणि १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातो. साधारणत: अर्थसंकल्पीय अधिवेशन मे महिन्यापर्यंत दोन टप्प्यांत चालते. राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प यावर चर्चा केली जाते. त्यानंतर ते मंजूर करून त्यात दिलेल्या आश्वासनानुसार देशातील सर्व राज्यांमध्ये योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:-

Check Also

रिलायन्स जिओचा आयपीओ येणार, मूल्यांकन १०० अब्ज डॉलर गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी

मराठी ई-बातम्या टीम मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ यावर्षी (आयपीओ) IPO आणू शकते. आयपीओचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *