Breaking News

रिटायरमेंटनंतरही पैशांचे नो टेन्शन! असे करा प्लानिंग एक लाख रूपये पेन्शनसाठी किती करावी लागेल गुंतवणूक

रिटायरमेंटनंतर जास्त पैशांची आवश्यकता असते. महिन्याला मिळणारा पगार बंद झाल्यानंतर रोजचा खर्च कसा करायचा असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दरम्यान, आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.जर तुम्हाला दर महिन्याला लाखो रूपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतील.

केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन स्कीमची सुरूवात केली आहे. या योजनेनुसार तुम्ही एका महिन्याला एक लाख रूपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. यात सरकारी कर्मचाऱ्यापासून ते खासगी कर्मचारी कोणीही गुंतवणूक करू शकतात. एनपीएसच्या अंतर्गत १८ ते ७० वर्षांचे नागरिक गुंतवणूक करू शकतात.

रिटायरमेंटचे वय जवळ आल्यावर लोक गुंतवणुकीसाठी त्रस्त होतात. तसेच ही गुंतवणूक कुठे करावी याबाबत विचार करू लागतात. नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये तुम्ही ७० वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. दरम्यान, तुम्हाला जितके लवकर शक्य असेल तितके लवकर गुंतवणूक सुरू करू शकता. तितकेच फायदेही अधिक होतात. नॅशनल पेन्शन स्कीम १ जानेवारी २००४मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर २००९मध्ये खाजगी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आली होती.

जर तुम्ही दर महिन्याला १० हजार रूपये ३० वर्षांपर्यंत गुंतवाल तर महिन्याला १ लाख रूपये पेन्शन मिळू शकते. तर रिटायरमेंटला १ कोटी रूपये एकरकमी मिळू शकतात. या योजनेत इक्विटी एक्सपोजर ५० ते ७५ टक्के आहे.

Check Also

पेटीएम, IIFL बँक आणि आता कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयची बंधन एकदम तीन बँकावर लादलेली बंधन सारखीच

भारताच्या आर्थिक परिस्थितीत, स्थिरता राखण्यात आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियामक निरीक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *