Breaking News

श्रद्धा कपूरने खरेदी केली ही महागडी गाडी , किंमत ऐकून बसेल धक्का श्रद्धाने खरेदी केली इतक्या कोटीची महागडी गाडी; होतोय शुभेच्छाच वर्षाव

अभिनेत्री श्रद्धा कपूरचे जगभरात लाखो चाहते आहेत. इतर अभिनेत्रींपेक्षा ती नेहमीच वेगळी असते आणि तिचा स्वभाव चाहत्यांना भलताच आवडतो. नुकतंच या स्टार अभिनेत्रीने दसऱ्याच्या मुहुर्तावर स्वत:साठी लँबॉर्गिनी कार खरेदी केली आहे. तिचे फोटो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘तू झुठी मै मक्कार’ या सिनेमात श्रद्धा दिसली होती. तर आता तिने दसऱ्याला स्वत:लाच कार गिफ्ट केली आहे.

Lamborgini Huracan Tecnica ही शानदार महागडी कार कोणा अभिनेत्याने नाही तर श्रद्धा कपूरने खरेदी केली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र तिचं कौतुक होतंय. शोरुमची मालकीण पूजा चौधरीने श्रद्धासोबत फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये मागे लाल रंगाची नवी कोरी लँबॉर्गिनी दिसत आहे. अभिनेत्रीने कारसोबत पोज दिली असून नव्या कोऱ्या गाडीतून फेरफटकाही मारला आहे.

सध्या तिच्या गाडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Aurtomobilardent या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रद्धाचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.श्रद्धाने यावेळी अगदी साधा लुक केला होता. जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, कपाळावर टिकली आणि कानात झुमके अशा साध्या लुकमध्ये ती दिसली. मुंबईत एखाद्या महिलेने ही कार घेणं हे पहिल्यांदाच घडलं आहे अशी माहिती पूजा चौधरी यांनी दिली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान ८९ मराठी चित्रपटांना आर्थिक अनुदानाचे वितरण

दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *