Breaking News

रावसाहेब दानवेंचे आश्वासन, रेल्वेसाठी लागणाऱ्या उत्पादनांमध्ये खाजगी उद्योगांचा सहभाग वाढवु

रेल्वे विभागासाठी लागणार्‍या विविध उत्पादनांपैकी खाजगी उद्योगांसाठी अधिक उत्पादने खुली करू अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ललित गांधी यांना दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने नुकतीच नवी दिल्ली मधील रेल भवन येथे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन रेल्वे विभागासाठी लागणारी अधिकाधिक उत्पादने खाजगी उद्योगांसाठी खुली करून देण्यासाठी केलेल्या मागणीचा पाठपुरावा व अन्य मागण्यांसाठी बैठक आयोजित केली होती त्याप्रसंगी ते बोलत होते.

रेल्वेसाठी लागणारे विविध सुटे भाग, उपकरणे उत्पादन करण्याची परवानगी खाजगी उद्योगांना दिल्यास मोठ्या प्रमाणावर उद्योग वाढण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी उपयोगी ठरेल अशी भुमिका ललित गांधी यांनी मांडली.

यावेळी रेल्वे माल वाहतुक, प्रवासी वाहतुकीसंबंधी विविध मागण्याही सादर करण्यात करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक पुणे नवीन रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू करणे, कोल्हापूर-वैभववाडी या कोकण रेल्वेस जोडणार्‍या मार्गाचे काम तात्काळ सुरू करणे, नाशिक- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करणे, कोरोना नंतर सेवा बंद केलेल्या सर्व गाड्या पुर्ववत सुरू करणे, कोरोना काळानंतर विविध एक्सप्रेस चे बंद केलेले सर्व थांबे पुर्ववत सुरू करणे या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश होता. तसेच कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ येथे पार्सल सेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.

यासर्व मागण्यांसाठी आवश्यक तो अहवाल तात्काळ तयार करण्याचे निर्देश रेल्वे राज्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. तसेच १७ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत लखनौ येथे संपन्न होणार्‍या रेल्वे च्या डिझाईन व संशोधन केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनास सहभागी होण्यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ च्या शिष्टमंडळाला विशेष निमंत्रण दिले.

Check Also

एचडीएफसीही आणणार दिर्घकालीन बॉण्ड ६० हजार कोटी रूपयांचे रोखे जारी करण्यास बोर्डाची मान्यता

एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने शनिवारी खाजगी प्लेसमेंट मोडद्वारे पुढील बारा महिन्यांत एकूण ₹६०,००० कोटी रुपयांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *