Breaking News

नोव्हेंबरमध्ये हे पाच मोठे बदल लागू होणार, जाणून घ्या नोव्हेंबरमध्ये अनेक बदल होणार

नोव्हेंबरमध्ये अनेक बदल होणार आहेत. या बदलांची आधीच माहिती असणे आलश्यक आहे. अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. नोव्हेंबरमध्ये जीएसटीपासून लॅपटॉप आयातीपर्यंत अनेक बदल होणार आहेत. या बदलांची माहिती जाणून घेऊया.

एलपीजी सिलिंडर किंमती
एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १ नोव्हेंबरला बदल होण्याची शक्यता आहे,. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या किमतीची आढावा घेतात. त्यामुळे एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ, घट किंवा किंमती तशाच राहू शकतात.

जीएसटी बदल
याशिवाय १०० कोटी किंवा त्याहून अधिक उलाढाल असलेल्या व्यवसायांना १ नोव्हेंबरपासून ३० दिवसांच्या आत ई-चलन पोर्टलवर जीएसटी चलन अपलोड करावे लागेल. जीएसटी प्राधिकरणाने सप्टेंबरमध्ये हा निर्णय घेतला होता.
लॅपटॉप आयातीची अंतिम मुदत

सरकारने HSN 8741 श्रेणी अंतर्गत येणारे लॅपटॉप, टॅब्लेट, वैयक्तिक संगणक (PC) आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर ३० ऑक्टोबरपर्यंत सूट दिली होती. मात्र, १ नोव्हेंबरपासून काय होणार याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही आयातबंदी १  नोव्हेंबरपासून लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करेल, अशी अपेक्षा आहे.

इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जवरील व्यवहार शुल्क वाढणार

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईने २० ऑक्टोबर रोजी जाहीर केले होते की ते १ नोव्हेंबरपासून इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागावरील व्यवहार शुल्क वाढवतील. हे बदल S&P BSE सेन्सेक्स पर्यायांवर लागू होतील. व्यवहाराच्या वाढत्या खर्चाचा व्यापाऱ्यांवर, विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम होईल

Kindle Reader साठी बदल
अॅमेझॉनने Kindle वरील सपोर्टेड फाईल्सचा सपोर्ट संपवत असल्याची घोषणा केली आहे. अॅमेझॉनने सांगितले की, यापुढे १ नोव्हेंबरपासून MOBI फॉरमॅटला सपोर्ट देणार नाही. हे शेवटचे स्मरणपत्र आहे की १ नोव्हेंबर २०२३ रोजी आम्ही MOBI पाठवण्यासाठी सपोर्ट बंद करण्यास सुरुवात करू. याचा परिणाम iOS, Android, Windows आणि Mac वर ईमेल पाठवणाऱ्या Kindle वापरकर्त्यांवर होईल.

 

Check Also

आता विमा विस्तार १५०० रुपयात, आयआरडिएआयचा विचार एजंटाना १० टक्के कमिशन देण्याची योजना

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडिएआय IRDAI ने शुक्रवारी येथे संपन्न झालेल्या दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *