Breaking News

अर्थसंकल्पामुळे दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्स ८४० अंकांनी कोसळलाच गुंतवणूकदारांना ४.५ लाख कोटींचा फटका

मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय अर्थसंकल्पात शेअर्सच्या नफ्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर आकारण्याच्या निर्णयावर देशातील शेअर बाजारांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. शुक्रवारी सेन्सेक्स तब्बल ८४० अंकांनी कोसळला. तर निफ्टीनेही २५६ अंकाची मोठी घसरण नोंदवली. ऑगस्ट २०१७ नंतर शेअर बाजार एवढ्या मोठ्या अंकाने खाली आला. शेवटच्या तासात झालेल्या जोरदार विक्रीने सेन्सेक्स ९०० अंकांपर्यंत कोसळला होता. या घसरणीत गुंतवणूकदारांना तब्बल ४.५ लाख कोटींचा फटका बसला आहे. आयटी निर्देशांक वगळता सर्व निर्देशांक घसरले.

का कोसळला बाजार ?
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरूवारी अर्थसंकल्प २०१८-१९ मध्ये शेअर्सपासून मिळणाऱ्या नफ्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभ कर आकारण्याची घोषणा केली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नाराजी पसरली. एक वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या शेअर्सवर जर १ लाख रूपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असेल तर गुंतवणूकदारांना १० टक्के कर द्यावा लागणार आहे. अर्थसंकल्प सादर होत असताना गुरूवारी ५०० अधिक अंकाने घसरण नोंदवली होती. तर शुक्रवारीही परकीय गुंतवणूकदार आणि देशातील गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. परिणामी सेन्सेक्स ९०० अंकापर्यंत कोसळला. गुंतवणूकदारांची यामध्ये चांगलीच दाणादाण उडाली.

निफ्टीतील ४५ शेअर्स घसरले
विक्रीच्या दबावाने निफ्टीतील ५० पैकी ४५ शेअर्स घसरून बंद झाले. टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टीसीएस, इन्फोसीस आणि एचयूएल हे पाच शेअर्स फक्त वधारले. अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, गेल, इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स, अॅक्सिस बँक, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती और टाटा मोटर्स आदी शेअर्सने मोठी घसरण नोंदवली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *