Breaking News

ब्लू जेट हेल्थकेअरचा आयपीओ २५ ऑक्टोबरपासून उघडणार सविस्तर तपशील जाणून घ्या

मुंबईस्थित औषधांसाठी कच्चा माल तयार करणारी कंपनी ब्लू जेट हेल्थकेअरचा आयपीओ पुढील आठवड्यात २५ ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी उघडणार आहे. कंपनी आयपीओमधून ८४० कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओसाठी प्रति शेअर ३२९-३४६ रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.

ब्लू जेट हेल्थकेअरचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित असेल. ऑफर फॉर सेलमध्ये कंपनीचे प्रवर्तक अक्षय बन्सरीलाल अरोरा आणि शिवेन अक्षय अरोरा २.४२ कोटी शेअर्स विकणार आहेत. हा आयपीओ २७ ऑक्टोबरपर्यंत खुला असेल.

अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ २३ ऑक्टोबर रोजी उघडला जाईल. आयपीओ ऑफर फॉर सेल असल्याने त्यातून मिळणारी सर्व रक्कम भागधारकांकडे जाईल. आयपीओमध्ये गुंतवणूकदार किमान ४३ शेअर्समध्ये बोली लावू शकतात. आयपीओ आकाराचा अर्धा भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, १५ टक्के उच्च निव्वळ मूल्य असलेल्या व्यक्तींसाठी आणि उर्वरित ३५ टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि जेपी मॉर्गन इंडिया हे आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

ब्लू जेट हेल्थकेअर नाविन्यपूर्ण फार्मास्युटिकल कंपन्या आणि बहुराष्ट्रीय जेनेरिक फार्मास्युटिकल कंपन्यांना खास उत्पादने पुरवते. ब्लू जेट हेल्थकेअर 1968 मध्ये अस्तित्वात आली. कंपनी तीन श्रेणींमध्ये कार्य करते – कॉन्ट्रास्ट मीडिया इंटरमीडिएट्स, हाय-इंटेन्सिटी स्वीटनर्स आणि फार्मा इंटरमीडिएट्स आणि सक्रिय फार्मास्युटिकल घटक. कंपनीने विशेष रसायनशास्त्र क्षमतेसह कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन व्यवसाय मॉडेल स्थापित केले आहे. गेल्या ५० वर्षांत कंपनीने १०० हून अधिक उत्पादने विकसित केली आहेत.

Check Also

Razorpayनेही आता एअरटेलबरोबर जारी केले युपीआय स्वीच कंपनीने जारी केलेल्या पत्रकातून माहिती

फिनटेक Fintech युनिकॉर्न रझोरपे Razorpay ने आज सांगितले की ते स्वतःचे UPI इन्फ्रास्ट्रक्चर लाँच करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *