Breaking News

IPO ची संमिश्र कामगिरी, जाणून घ्या कोणत्या आयपीओने फायदा-तोटा केला सूर्योदय स्मॉल फायनान्सकडून सर्वाधिक तोटा तर पारस डिफेन्सकडून लाभ

मराठी ई-बातम्या टीम

तेजी असलेल्या IPO बाजारात यंदा संमिश्र कामगिरी झाली आहे. आतापर्यंत आणलेल्या ३१ कंपन्यांच्या आयपीओमध्ये १४ कंपन्यांनी तोटा दिला आहे. तर १७ कंपन्यांनी लाभ दिला आहे. यामध्ये सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने सर्वाधिक तोटा तर पारस डिफेन्सच्या शेअर्सने सर्वाधिक नफा दिला आहे.

आयपीओ आणलेल्या अनेक कंपन्यांचे शेअर्स इश्यू किमतीपेक्षा कमी व्यवहार करत आहेत. त्यांच्यापैकी Suryoday चा शेअर्स ५१ टक्के खाली आहे. कारट्रेडचा शेअर ४३ टक्के खाली ट्रेड करत आहे. तर Windlass Bio चा शेअर ३९ टक्के घसरला आहे. फिनो पेमेंट्स बँकेच्या शेअरने २६.७ टक्के आणि कृष्णा डायग्नोस्टिकच्या शेअर्सने २५.५ टक्के फायदा गुंतवणूकदारांना दिला आहे.

सर्वात मोठा आयपीओ घेऊन आलेली पेटीएम तोटा देण्यात चौथ्या क्रमांकावर आहे. पेटीएमचा शेअर्स इश्यू किमतीपेक्षा २३.३ टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहे. कल्याण ज्वेलर्स २०.५ टक्के आणि SJS शेअर्स १८.५ टक्के खाली आहे. देशातील चौथी म्युच्युअल फंड कंपनी म्हणून सूचीबद्ध असलेल्या बिर्ला अॅसेट मॅनेजमेंटच्या समभागात १८.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. ग्लेनमार्क लाइफ सायन्सच्या समभागाने १६ आणि ऍप्टस व्हॅल्यू हाउसिंगचा ११.४ टक्के तोटा दिला आहे.

रेल्वे लिस्टेड कंपनी IRFC चे शेअर्स १० टक्के घसरले आहेत, तर Sapphire Foods चे ९.२ टक्के आणि Antony West चे शेअर्स ७.६ टक्के घसरले आहेत. १०० टक्के पेक्षा जास्त नफा देणार्‍या शेअर्स बोलायचे झाल्यास, पारस डिफेन्स आघाडीवर आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना ३३४ टक्के नफा दिला आहे. एमटीएआर टेकच्या शेअर्सने २८० टक्के आणि न्यूरेकाच्या शेअर्सने २७५ टक्के नफा दिला आहे.

लक्ष्मी ऑरगॅनिकच्या शेअर्सने २३५ टक्के लेटेंट व्ह्यूने २२४ टक्के, बार्बेक नेशनने २०२ टक्के आणि मॅक्रोटेक डेव्हलपर्सने १९४ टक्के वाढ दिली आहे. क्लीन सायन्स १७४ टक्के, इझी ट्रिप १७० टक्के, सिगाची इंडस्ट्रीज १६७ टक्के आणि सोना BLW १६३ टक्के वाढला आहे. बर्गर किंगच्या शेअरने १५३ टक्के स्टोव्ह क्राफ्टच्या शेअरने १५० टक्के आणि तत्व चिंतनच्या शेअरने १४० टक्केचा फायदा गुंतवणूकदारांना दिला आहे. गेमिंग कंपनी नझारा टेकलाही फायदा झाला आहे. या शेअर्सने ११५ टक्के, Infra च्या समभागाने १०९ टक्केची वाढ दिली आहे आणि Nyka च्या समभागाने १०६ टक्केची वाढ दिली आहे.

डिसेंबर अखेरीस IPO द्वारे यावर्षी १.४५ लाख कोटी रुपये उभारले जातील अशी अपेक्षा आहे. याआधी २०१७ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक ७५ हजार कोटी रुपये जमा झाले होते. पेटीएमने आतापर्यंतची सर्वात मोठा आयपीओ आणला. यामधून पेटीएमने १८,३०० कोटी रुपये उभे केले. तर Zomato ने ९,३७५ कोटी रुपये उभे केले होते. नुरेकाने उभारलेली सर्वात कमी रक्कम १०० कोटी रुपये होती. स्टार हेल्थने ७,२४९ कोटी रुपये उभे केले आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *