Breaking News

Tag Archives: 31 ipos almost 17 ipo given benefit for investor and 13 ipos given losses but still investor wanted to invest in the ipo which is given more return.

IPO ची संमिश्र कामगिरी, जाणून घ्या कोणत्या आयपीओने फायदा-तोटा केला सूर्योदय स्मॉल फायनान्सकडून सर्वाधिक तोटा तर पारस डिफेन्सकडून लाभ

मराठी ई-बातम्या टीम तेजी असलेल्या IPO बाजारात यंदा संमिश्र कामगिरी झाली आहे. आतापर्यंत आणलेल्या ३१ कंपन्यांच्या आयपीओमध्ये १४ कंपन्यांनी तोटा दिला आहे. तर १७ कंपन्यांनी लाभ दिला आहे. यामध्ये सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने सर्वाधिक तोटा तर पारस डिफेन्सच्या शेअर्सने सर्वाधिक नफा दिला आहे. आयपीओ आणलेल्या अनेक कंपन्यांचे शेअर्स इश्यू किमतीपेक्षा कमी व्यवहार करत आहेत. त्यांच्यापैकी Suryoday चा शेअर्स ५१ टक्के खाली आहे. कारट्रेडचा शेअर ४३ टक्के खाली ट्रेड करत आहे. तर Windlass Bio चा शेअर ३९ टक्के घसरला आहे. फिनो पेमेंट्स बँकेच्या शेअरने २६.७ टक्के आणि कृष्णा डायग्नोस्टिकच्या शेअर्सने २५.५ टक्के फायदा गुंतवणूकदारांना दिला आहे. सर्वात मोठा आयपीओ घेऊन आलेली पेटीएम तोटा देण्यात चौथ्या क्रमांकावर आहे. पेटीएमचा शेअर्स इश्यू किमतीपेक्षा २३.३ टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहे. कल्याण ज्वेलर्स २०.५ टक्के आणि SJS शेअर्स १८.५ टक्के खाली आहे. देशातील चौथी म्युच्युअल फंड कंपनी म्हणून सूचीबद्ध असलेल्या बिर्ला अॅसेट मॅनेजमेंटच्या समभागात १८.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. ग्लेनमार्क लाइफ सायन्सच्या समभागाने १६ आणि ऍप्टस व्हॅल्यू हाउसिंगचा ११.४ टक्के तोटा दिला आहे. रेल्वे लिस्टेड कंपनी IRFC चे शेअर्स १० टक्के घसरले आहेत, तर Sapphire Foods चे ९.२ टक्के आणि Antony West चे शेअर्स ७.६ टक्के घसरले आहेत. १०० टक्के पेक्षा जास्त नफा देणार्‍या शेअर्स बोलायचे झाल्यास, पारस डिफेन्स आघाडीवर आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना …

Read More »