Breaking News

दरमहा एसआयपीमध्ये होतेय ११ हजार कोटींची गुंतवणूक म्युच्युअल फंड उद्योग ३८.४५ लाख कोटींवर

मराठी ई-बातम्या टीम

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. यामुळे म्युच्युअल फंड उद्योगाची सरासरी मालमत्ता (AUM) ३८.४५ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. नोव्हेंबर महिन्यात ११,६१४ कोटी रुपये इक्विटी फंडात आले आहेत. इक्विटी योजनेत सलग नवव्या महिन्यात मोठी गुंतवणूक झाली आहे.

शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. मात्र इक्विटी फंडातील गुंतवणूक वाढत आहे. गुंतवणूकदार सतत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत  आहेत. ऑक्टोबरमध्ये इक्विटी योजनेत ५,२१५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. त्याचप्रमाणे नोव्हेंबरमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP मध्ये ११ हजार कोटी रुपये आले आहेत. हा आतापर्यंतचा विक्रम आहे.

नोव्हेंबर महिन्यात निफ्टीने ६ टक्क्यांची घसरण नोंदवली होती. कारण ऑक्टोबरमध्ये सेन्सेक्सने ६२ हजारांचा ऐतिहासिक आकडा पार केला होता. गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला. त्यानंतर बाजारात घसरण विशेषत: विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये आपली गुंतवणूक काढून  घेतली.

म्युच्युअल फंडांच्या सर्व २३ ओपन-एंडेड इक्विटी ओरिएंटेड आणि हायब्रिड योजना श्रेणींमध्ये नोव्हेंबरमध्ये सकारात्मक गुंतवणूक दिसून आली. याचा अर्थ शेअर बाजारात अजूनही गुंतवणूकदारांचा सकारात्मक कल आहे. नोव्हेंबरमध्ये बाजारात घसरण दिसून आली तेव्हा गुंतवणूकदारांनी याचा फायदा घेत म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ऑक्टोबरमध्ये, गुंतवणूकदारांनी बाजारातील तेजीत २३,४५६ कोटी रुपये काढले, तर नोव्हेंबरमध्ये केवळ १७,४७६ कोटी रुपये काढले गेले.

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये एसआयपीमध्ये ४८६ कोटी अधिक आले. SIP म्हणजे महिन्याला गुंतवलेली रक्कम. हा विभाग फक्त इक्विटीमध्ये गुंतवणूक करतो. गुंतवणूकदार सतत हायब्रिड फंडात गुंतवणूक करत असतात. यामध्ये, बॅलन्स अॅडव्हांटेज फंड श्रेणीला सर्वाधिक पसंती दिली जाते. हा वर्ग कमी किमतीत शेअर्स खरेदी करतो आणि उच्च दराने विकतो. गुंतवणूकदारांना नोव्हेंबर महिन्यात ६,०९४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

३० नोव्हेंबर २०११ पर्यंत, म्युच्युअल फंडाची एकूण AUM फक्त ६.८२ लाख कोटी रुपये होती, जी आता ३७.३४ लाख कोटी रुपये झाली आहे. १० वर्षात ती पाच पटीने वाढली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत AUM ३० लाख कोटी रुपये होती. म्युच्युअल फंडामध्ये एकूण ११.७० कोटी खाती आहेत. एसबीआय म्युच्युअल फंडाची सर्वाधिक ६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. ICICI प्रुडेन्शियल (रु. ४.४७ लाख कोटी), HDFC म्युच्युअल फंड (रु. ४.३८ लाख कोटी) हे देशातील पाच टॉप फंड हाऊस आहेत. बिर्ला म्युच्युअल फंड आणि कोटक म्युच्युअल फंड देखील टॉप ५ मध्ये आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *