Breaking News

रोहितची म्युझिक अकादमी सुरू लातूरात सुरु केली मर्म म्युजिक अकादमी

मुंबई : प्रतिनिधी

रोहित राऊत हे नाव पहिल्यांदा झी मराठी वाहिनीवरील लिटील चॅम्प्स सारेगमपाच्या मंचावर गाजलं. चिमुरड्या गायकांच्या यादीत आपला वेगळा ठसा उमटवत तेव्हापासूनच रोहितने स्वत:चं वेगळं अस्तित्व सिद्ध केलं होतं. पार्श्वगायनाकडे वळल्यानंतर रोहितने बऱ्याच मराठी गाण्यांना सूर दिला आहे. याच रोहितने आता म्युझिक अकादमी सुरू केली आहे.

रोहित्याच्या या अकादमीचं नाव आहे मर्म म्युझिक अकादमी. आजच्या रिअॅलिटी शोजच्या युगात नवीन टॅलेंटला उचित संधी मिळावी या उद्देशाने रोहितने आपल्या गावी लातूरला मर्म म्युझिक अकादमी सुरू केली आहे. याविषयी माहिती देताना रोहित म्हणाला की, लातूरला संगीताचं ज्ञान असलेल्या चांगल्या गुरूंची किंवा टॅलेंटची कमतरता नाही, पण तरूण प्रतिभेला गायनक्षेत्रात करीयर करताना कॉन्फिडन्स देण्याची आणि त्यांच्या प्रतिभेला पैलू पाडण्याची गरज असते. मुंबईसारख्या महानगरात येऊन छोट्या गावातली किंवा शहरातली मुलं बुजून जातात. प्रतिभा असूनही मागे पडतात. अशावेळी मुंबईत करीयर करायला जाताना त्यांना ग्रुमिंग करण्याची आवश्यकता असल्याचं मला भासली आणि याच संकल्पनेतून मर्म म्युझिक अकादमीचा जन्म झाल्याचं रोहितचं म्हणणं आहे.

याप्रसंगी लातूरमध्ये ‘रोहित राऊत-जुईली जोगळेकर लाइव इन कॉन्सर्ट’चं आयोजन करण्यात आलं होतं. रसिकांनी कॉन्सर्टला भरूभरून प्रतिसाद दिला. अकादमी सुरू करण्यामागील उद्देशाबाबत विस्ताराने सांगताना रोहित म्हणाला की, बऱ्याचदा असं होतं की, कलाकार मोठा झाल्यावर तो जन्मगावी जाणं कमी करतो. तसं माझ्याबाबतीत होऊ नये, हा माझा यामागचा मूळ उद्देश आहे. मला माझ्या मातीसाठी काहीतरी करण्याची खुप इच्छा आहे. रोहित राऊत फाऊंडेशनव्दारे अशा पध्दतीने समाजाची परतफेड करण्याचा आपला प्रयत्न राहिल असंही रोहित म्हणाला.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *