Breaking News

राज्यातील वृद्ध कलावंतांना सरकारकडून मिळणार थकीत मानधन सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वृद्ध कलावंतांचे थकित असलेले मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
शासनातर्फे राज्यातील वृद्ध कलावंतांना मासिक मानधन देण्याची योजना राबविली जाते. स्वतःच्या कलेने लोकांचे मनोरंजन करणाऱ्या कलावंतांना वृद्धापकाळात कलेचे सादरीकरण शक्य होत नाही. मात्र कला हीच त्यांची उवजीविका असल्याने कलावंतांचे वय झाल्यावर अनेक प्रश्न निर्माण होतात. कलावंत हा समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. प्रगतिशील समाज हा समाजातील कलावंतामुळे ओळखला जातो. समाजातून निर्माण झालेला कलावंत अनेकवेळा सामाजिक प्रबोधनाद्वारे लोकांना दिशा दाखविण्याचे सुद्धा काम करत असतो.
कलावंतांप्रति शासन त्यांच्या कल्याणासाठी व सहायता करण्यासाठी कटिबद्ध आहे.
राज्यात कोविड मुळे उद्भवलेल्या संकटात कलावंताच्या थकीत मानधनाचा प्रश्न निर्माण झाला होता. वृद्ध कलावंतांच्या अनेक शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन व्यथा मांडली होती, याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री अमितजी देशमुख यांचे माध्यमातून वित्त विभागाकडून वृद्ध कलावंतांचे हा थकित मानधन देण्यासाठीचा निर्णय आम्ही घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यातील दोन महिन्यांचे थकीत मानधन येत्या आठवड्यात कलावंतांच्या खात्यात जमा होणार आहे. कोविड काळात आता जवळपास २८,८०० कलावंतांना यामुळे दिलासा मिळणार असून याबाबत महाविकास आघाडी सरकारचे कलावंत संघटनेचे पदाधिकारी व अनेक वृद्ध कलावंतांनी आभार मानले आहेत.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *