Breaking News

ऑस्कर अवार्डः स्मिथने क्रिस रॉकला मुस्कटात लगावल्यानंतर मागितली माफी किंग रिचर्ड चित्रपटासाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

हॉलीवूडसह जगभरातील चित्रपट कलावंतासाठी महत्वाचा असलेल्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आज करण्यात आले. मात्र सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अचानक संतापलेल्या विल स्मिथने सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या मंचावर येत मुस्कटात लगावली. त्यानंतर विल स्मिथने रॉक आणि ऑस्कर अॅकेडमीची माफी मागितली.
कोरोना नंतर दोन वर्षांनी यंदा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऑस्करच्या मंचावर जे काही झाले ते कोणालाही अपेक्षित नव्हते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर जाऊन कानशिलात लगावली आहे.
विल स्मिथला ‘किंग रिचर्ड’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला. जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तो मंचावर गेला तेव्हा डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. पुरस्कार स्वीकारताना विल स्मिथ खूपच भावुक झाला होता. त्यावेळी त्याने माफी देखील मागितली. तो म्हणाला, रिचर्ड विलियम्स यांनी त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मी आज खूप खुश आहे. देव माझ्याकडून काय करून घेऊ इच्छितो अनं मी काय करतोय हे जाणून घेल्यानंतर मला आनंद झाला आहे.
‘मी आज अकादमीची माफी मागू इच्छितो. माझ्यासोबत ज्यांना नामांकन मिळाले आहे त्या सर्वांनी मला माफ करा. हा एक सुंदर क्षण आहे आणि मी जिंकलोय म्हणून माझ्या डोळ्यात हे अश्रू नाहीयेत. मी आज एक ध्येय वेड्या बापाप्रमाणे दिसतोय. विलियम्स रिचर्ड यांच्यासारखा. शेवटी प्रेमात माणूस वेड्यासारखं वागतोच. धन्यवाद आणि आशा करतो की अकादमी मला पुन्हा या मंचावर आमंत्रित करेल अशी भावना त्याने व्यक्त केली.
विल स्मिथला यावर्षी ‘किंग रिचर्ड’साठी नामांकन मिळाले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाची कथा टेनिसपटू सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स यांचे वडील रिचर्ड विल्यम्स यांच्या कथेवर आधारित आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *