Breaking News

नाना पाटेकरच्या मराठी चित्रपटाचा हिंदीत रिमेक सैराट नंतर ‘आपला मानूस’च्या हिंदी रिमेक : करीना करणार काम

मुंबई : प्रतिनिधी

हिंदी सिनेसृष्टीत सध्या प्रादेषिक भाषेतील चित्रपटांचा रिमेक बनवण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. यात मराठीचाही झेंडा मोठ्या डौलाने फडकताना दिसतोय. बॅालिवुडमधील ख्यातनाम निर्माता-दिग्दर्शक अशी ओळख असलेला करण जोहर ‘सैराट’च्या प्रेमात पडला आणि तो ‘धडक’ शीर्षकाने या चित्रपटाचा रिमेक बनवतोय. या मागोमाग नुकताच प्रदर्शित झालेल्या सतिश राजवाडे दिग्दर्शित आणि नाना पाटेकर अभिनीत ‘आपला मानूस’ या चित्रपटाचाही हिंदी रिमेक बनणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आाहे.

‘आपला मानूस’चा हिंदी रिमेक बनण्याची शक्यता सतिशने यापूर्वीच व्यक्त केली होती. या वृत्तामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हिंदीतील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक असलेला मराठमोळा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ‘आपला मानूस’च्या हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी त्याने करीना कपूरची निवड केल्याचे समजते. तैमूरच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर गेलेली करीना सोनम कपूर, शीखा तल्सानिया आणि स्वरा भास्कर यांच्यासोबत ‘वीरे दी वेडींग’ या चित्रपटाद्वारे सिल्व्हर स्क्रीनवर पुनरागमन करीत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच करीनाने आगामी चित्रपट साइन करणं ही तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या आवडत्या अभिनेत्रीला पुन्हा एकदा एका वेगळ्या रूपात पाहण्याची संधी करीनाच्या चाहत्यांना लाभणार आहे. करीना देखील आशुतोषसोबत काम करायला खूप उत्सुक असून ‘आपला मानूस’ या चित्रपटाचं सर्वच स्तरांमधून कौतुक झाल्याने या चित्रपटाकडून तिला खूप अपेक्षाही असल्याचे समजते.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *