Breaking News

सुरुवात तुम्ही केलीय मात्र शेवट आम्ही करणार घोटाळ्याची रोज एक सीडी बाहेर काढणार असल्याची धनंजय मुंडे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

एका दूरचित्रवाहीनीवर विधिमंडळात प्रश्न न लावण्यासंदर्भात मला पैसे दिल्याचा वृत दाखविण्यात आले. विशेष म्हणजे यासंदर्भात मुंबईतील शासकिय निवासस्थानी असूनही कोणी याबाबत संपर्क  केला नसल्याचे दु:ख असल्याचे सांगत या सभाग्रुहात मी प्रत्येक मंत्र्यांना अडचणीत आणल्याने त्याचा मनात राग धरूनमाझ्यावर हे आरोप केले गेले आहेत. तुम्ही हजार अग्नीपरीक्षा घ्या मी त्या अग्नीपरीक्षेला सामोरे जाईल. मला निलंबीत करा मला काही परवा नाही. मात्र मी आतापर्यंत या सभागृहात जेवढे आरोप केलेत त्याची खुली चौकशी करण्याचे आव्हान राज्य सरकारला देत भ्रष्टाचाराच्या आरोपाची तुम्ही सुरुवात केलीय. मात्र त्याचा शेवट आम्ही करणार असल्याचे सांगत  ग्रामविकास मंत्र्यांच्या पी.एच्या भ्रष्टाचाराची सिडी देत त्याची सुरुवात करत असल्याची घोषणा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

२८ फेब्रुवारी २०१८ रोजी न्यूज १८ या वृत्तवाहिनीवर माझ्याबाबतीत बातमी दाखवली गेली. विधिमंडळात दलाली सुरू आहे असा आरोप केला गेला. ही गोष्ट विधिमंडळाची बदनामी करणारी आहे. सभागृहाने या विरोधात आवाज उठवणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही, अशा खालच्या पातळीचे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. याची सुरुवात कोणीही केली असेल, पण याचा अंत मात्र विरोधी पक्ष करणार

असल्याचे सांगत मी या प्रकरणाच्या खोलाशी मी गेलो आहे. मी बातमी कोणी सोडली, कशी सोडली, ती व्यक्ती कोण कोणाला भेटली हे सर्व मला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.

ही लक्षवेधी सुचना आहे २०१६मधली. जर मी पैसे घेतले असतील तर २०१७मध्ये याच लक्षवेधीबाबत तारांकीत प्रश्न कसा उपस्थित झाला ? सत्ताधाऱ्यांनी मला हरवण्याचा प्रयत्न केला पण मी आज जिंकलोय. मी ज्या पद्धतीने सरकारविरोधात आवाज उठवतोय ते सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात खुपतंय म्हणून असे आरोप माझ्यावर केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

तुम्ही हजार अग्नीपरीक्षा घ्या मी त्या अग्नीपरीक्षेला सामोरे जाईल. मला निलंबीत करा मला काही परवा नाही मात्र मी आतापर्यंत या सभागृहात जेवढे आरोप केलेत त्याची ओपन चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली.

विरोधी पक्षनेता या नात्याने माझी बांधिलकी ही राज्यातील १२ कोटी जनतेशी आहे. याप्रकरणी धनंजय मुंडेसह धनंजय गावडे, प्रमोद दळवी, न्यूज १८ या चैनलच्या संपादकाचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ सुनिल तटकरे, विद्या चव्हाण, अमरसिंह पंडीत, जोगेंद्र कवाडे यांनी भाषणे केली.

तसेच मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे सुजितसिंग ठाकूर, प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत केली.

 

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *