Breaking News

घरेलु कामगार कल्याण मंडळामार्फत घर मोलकरणींना पैसे द्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय घरकामगार चळवळीची मागणी

मुंबई: विशेष प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन केले आहे. या पार्श्वभूमीवर घरकामगार आणि त्यांच्या मालकांनी संमतीने काम बंद केले. परंतु त्यांचा रखडलेला मार्चचा पगार लगेच मिळणे शक्य नसल्याने या घरकामगार मोलकरणींना पैसे देण्यासाठी राज्य सरकारनेच स्थापन केलेल्या घरेलु कामगार मंडळाच्या खात्याकडून थकबाकीची रक्कम देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय घरकामगार चळवळीचे समन्वयक ज्ञानेश पाटील आणि अध्यक्षा मंगला बावीसकर यांनी केली.

आज आपण सर्वच एका मोठ्या संकटाशी मुकाबला करतोत, राज्य शासनाने ठोस निर्णय घेऊन शक्यतेवढी जनतेची काळजी घेण्याचा प्रयत्न केलाय त्याचे आम्ही स्वागत करतो, पण हे होत असतांना काही व्यवहारिक प्रश्न हातावर पोट असणाऱ्या कामगारांना भेडसवणार आहेत ,व ते प्रामुख्याने आर्थिक आहेत…जगण्यासाठी लागणा-या मुलभूत गोष्टी खरेदी करुन मिळवण्याबाबत आहेत. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने घरकामगार महीलांचा रोजगार थांबल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यमान परिस्थिती पाहता त्यांचे मार्चचे पगार हातात पडणे शक्य होणार नाहीयेत. त्यामुळे या घरकामगारांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या घरेलु कामगार कल्याण मंडळा मार्फत त्यांना मदत करणे शक्य आहे. या घरकामगारांनी या मंडळात नोंदणी केली आहे. तसेच त्यांच्या नोंदणीशी त्यांचे बँक खाते जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे नोंदणीकृत महिलांना मदतीचा हात म्हणून ३१ मार्च पर्यंत किमान ५०००/- रुपये बोर्डाने तातडीने जमा करावेत व आपल्या विभागीय कार्यालया मार्फत अन्नधान्य पाकीटे, किराणा ,औषधे यांचा पुरवठा करण्या चा आदेश आपण कामगार विभागाला द्यावा अशी मागणी करत या वितरणासाठी जे मनुष्यबळ लागेल ते मनुष्यबळ एक सामाजिक जबाबदारी म्हणून घरकामगारांच्या संघटना वा संस्था व युनियन पुरवतील अशी हमी त्यांनी दिली.

तसेच सन २०११ पासुन ही थकीत देण्यात आलेली नसल्याने ही रक्कम दिल्यास या लॉकडाऊनच्या परिस्थितीत महिला घरकामगारांना तेवढाच दिलासा मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *