Breaking News

कोरोनाने एमएमआरमध्ये दोन हजार तर राज्यात २६०० ची संख्या ओलांडली सलग दुसऱ्यादिवशी मुंबईसह राज्यात ३५० जणांचे निदान

मुंबई: प्रतिनिधी

मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्येत सातत्याने वाढ होत असून काल ३५० रूग्णांचे निदान झाले. तितकेच रूग्ण आजही पुन्हा सापडले आहेत. एकट्या मुंबई शहरात १७५६ वर रूग्ण संख्या पोहोचली आहे. तर ठाणे जिल्ह्यात २४४ संख्या असे मिळून मुंबई महानगर प्रदेशाने २ हजाराचा आखडा पार केला असून राज्याची संख्या २ हजार ६८४ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात कोरोनाबाधीत १८ रूग्णांचे  निधन झाले, तर २५९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज राज्यात १८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ११, पुण्यातील ४ तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे.

मृत्यूंबद्दल अधिकची माहिती

आज झालेल्या मृत्यूंपैकी  ११ पुरुष तर ७ महिला आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूपैकी ५ जण हे ६० वर्षांवरील आहेत ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत.  तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांपैकी १३ रुग्णांमध्ये ( ७२ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. या रुग्णांपैकी एकाला कॅन्सर तर एकाला क्षयरोग होता. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १७८ झाली आहे.

प्रयोगशाळा तपासण्या

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४६,५८८ नमुन्यांपैकी ४२,८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २६८४  जण पॉझिटिव्ह आले आहेत.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण ५०५९ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी १८.३७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

इतर महत्वाचे मुद्दे

  1. आजपर्यंत राज्यातून २५९ कोविड १९ रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
  2. सध्या राज्यात ६७,७०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५,६४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  3. निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ५० जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत १४ तर प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत.
    अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
    मुंबई महानगरपालिका १७५६ ११२
    ठाणे १०
    ठाणे मनपा ९६
    नवी मुंबई मनपा ६३
    कल्याण डोंबवली मनपा ५०
    उल्हासनगर मनपा
    भिवंडी निजामपूर मनपा
    मीरा भाईंदर मनपा ४९
    पालघर
    १० वसई विरार मनपा २९
    ११ रायगड
    १२ पनवेल मनपा १०
      ठाणे मंडळ एकूण २०७५ १२७
    १३ नाशिक
    १४ नाशिक मनपा
    १५ मालेगाव मनपा ४२
    १६ अहमदनगर १०
    १७ अहमदनगर मनपा १७
    १८ धुळे
    १९ धुळे मनपा
    २० जळगाव
    २१ जळगाव मनपा
    २२ नंदूरबार
      नाशिक मंडळ एकूण ७७  ५
    २३ पुणे १०
    २४ पुणे मनपा ३१० ३४
    २५ पिंपरी चिंचवड मनपा ३१
    २६ सोलापूर
    २७ सोलापूर मनपा
    २८ सातारा
      पुणे मंडळ एकूण ३५८ ३८
    २९ कोल्हापूर
    ३० कोल्हापूर मनपा
    ३१ सांगली २६
    ३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
    ३३ सिंधुदुर्ग
    ३४ रत्नागिरी
      कोल्हापूर मंडळ एकूण ३९
    ३५ औरंगाबाद
    ३६ औरंगाबाद मनपा २३
    ३७ जालना
    ३८ हिंगोली
    ३९ परभणी
    ४० परभणी मनपा
      औरंगाबाद मंडळ एकूण २५
    ४१ लातूर
    ४२ लातूर मनपा
    ४३ उस्मानाबाद
    ४४ बीड
    ४५ नांदेड
    ४६ नांदेड मनपा
      लातूर मंडळ एकूण १३
    ४७ अकोला
    ४८ अकोला मनपा १२
    ४९ अमरावती
    ५० अमरावती मनपा
    ५१ यवतमाळ
    ५२ बुलढाणा १७
    ५३ वाशिम
      अकोला मंडळ एकूण ४१
    ५४ नागपूर
    ५५ नागपूर मनपा ३९
    ५६ वर्धा
    ५७ भंडारा
    ५८ गोंदिया
    ५९ चंद्रपूर
    ६० चंद्रपूर मनपा
    ६१ गडचिरोली
      नागपूर एकूण ४५
      इतर राज्ये ११
      एकूण २६८४ १७८

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *