Breaking News

राज्य मंत्रिमंडळातील १० वे मंत्री कोरोना पॉझिटीव्ह ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील मंत्री राज्यमंत्री कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात आता शिवसेनेचे सर्वाधिक कार्यक्षम म्हणून लौकिक असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी आज स्वत: ट्विटरवरून दिली.

आतापर्यंत राज्य मंत्रिमंडळातील अशोक चव्हाण, डॉ.जितेंन्द्र आव्हाड, हसन मुश्रीफ, डॉ.नितीन राऊत, धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, बच्चू कडू, प्राजक्त तनपुरे आदी कोरोनाबाधित झाले. यातील जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे हे त्यातून बरे झाले. तर इतरजण कोरोनावर उपचार करून घेत आहेत. मात्र आज एकनाथ शिंदे यांचाही अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी असे आवाहन करत सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन मंत्री शिंदे यांनी केली.

Check Also

युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत मात्र कोविड सुविधा काढून टाकू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाकाळात महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा या मोहिमेच्या निमित्ताने तयार झाला आहे. मोहिमेत सापडलेल्या सहव्याधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *