Breaking News

कोरोना : ५७ हजारापार- २१ शहरांमध्ये किमान ५०० ते हजाराहून अधिक रूग्ण ५७ हजार ७४ नवे बाधित, २७ हजार ५०८ बरे झाले तर २२२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

काल शनिवारी मुंबईत ९ हजारावर असलेल्या संख्येत तब्बल दोन हजाराने वाढ होत आज ११ हजार २०६ रूग्ण आढळले. तर राज्यातील २१ शहरांमध्ये किमान ५०० रूग्णांपासून ३ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची संख्येत शनिवारच्या तुलनेत एकदम ८ हजाराने वाढ झाल्याने थेट ५७ हजार ७४ वर पोहोचली आहे. तर राज्यात आतापर्यत २ कोटी नागरीकांच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत.

या २१ शहरांमध्ये ठाणे शहर व ग्रामीण मध्ये २७७५, नवी मुंबई १५०० हून अधिक, कल्याण डोंबिवली १७४०, रायगड       ५०६, पनवेल ६७२, नाशिक शहर व ग्रामीण ३६२८, अहमदनगर शहर व ग्रामीण १५५३, जळगांव शहर व ग्रामीण १३०० हून अधिक, नंदूरबार ६४४, ८ हजार १०० हून अधिक, पिंपरी चिंचवड ३३०७, सोलापूर शहर व ग्रामीण हजाराहून अधिक, औरंगाबाद शहर व ग्रामीण मध्ये १७०० हून अधिक, जालन्यात ५०० हून अधिक, परभणीत ८०० हून अधिक, नांदेड शहर व ग्रामीण मध्ये १२०० हून अधिक, बुलढाणा १ हजाराहून अधिक, नागपूर शहर व ग्रामीण मध्ये ४ हजाराहून अधिक, भंडारा ८५६ असे बाधित आढळून आले आहेत.

मागील २४ तासात २७ हजार ५०८ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २५ लाख २२ हजार ८२३ बाधित बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.८% एवढे झाले आहे. राज्यात ५७ हजार ०७४  नवीन रुग्णांचे निदान झाल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४ लाख ३० हजार ५०३ वर पोहोचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज २२२  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५ लाख ४० हजार १११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,१०,५९७ (१४.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,०५,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,७११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. (सोबतचा चार्ट पहावा)

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११,२०६ ४,५२,६८१ २५ ११,७७९
ठाणे १,०५१ ५४,२०८ १,०२३
ठाणे मनपा १,७२४ ८५,१४० १,३३५
नवी मुंबई मनपा १,५३६ ७६,१३७ १,२०८
कल्याण डोंबवली मनपा १,७४० ८९,०१२ १,१३८
उल्हासनगर मनपा १७१ १४,६८७ ३७५
भिवंडी निजामपूर मनपा ११० ८,२८८ ३५८
मीरा भाईंदर मनपा ४७६ ३४,१८२ ६८९
पालघर ३०५ २०,११७ ३२७
१० वसईविरार मनपा ४४५ ३६,५४४ ६९१
११ रायगड ५०६ ४३,२०७ १,०२७
१२ पनवेल मनपा ६७२ ४१,११० ६७३
ठाणे मंडळ एकूण १९,९४२ ९,५५,३१३ ४५ २०,६२३
१३ नाशिक १,४८८ ६०,६७५ १४ ९१३
१४ नाशिक मनपा २,१५० १,२५,६८३ १२ १,२०७
१५ मालेगाव मनपा २१ ७,१९७ १८२
१६ अहमदनगर १,००९ ६५,७८८ ८००
१७ अहमदनगर मनपा ५४४ ३४,७९७ ४३७
१८ धुळे ३०६ १४,७५७ २०९
१९ धुळे मनपा १७२ १३,०२३ १७७
२० जळगाव ९५५ ६६,३४१ १,२४०
२१ जळगाव मनपा ३७७ २४,०७३ ३६५
२२ नंदूरबार ६४४ २०,६४८ ३०४
नाशिक मंडळ एकूण ७,६६६ ४,३२,९८२ ३९ ५,८३४
२३ पुणे २,८४४ १,३२,२३९ २,२६०
२४ पुणे मनपा ६,३२१ २,९८,२६८ ४,७८२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३,३०७ १,४६,२५१ १,३९२
२६ सोलापूर ६१९ ५१,४४५ १,२७९
२७ सोलापूर मनपा ३९९ १९,०९५ ६५१
२८ सातारा ४८७ ६७,९१४ १,८९२
पुणे मंडळ एकूण १३,९७७ ७,१५,२१२ १९ १२,२५६
२९ कोल्हापूर ८८ ३६,०१० १,२७०
३० कोल्हापूर मनपा ७५ १५,८९५ ४२८
३१ सांगली २७९ ३६,१०७ १,१८१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १६६ १९,७१० ६५३
३३ सिंधुदुर्ग ८८ ७,५७४ १९१
३४ रत्नागिरी २२८ १३,४२७ ४२९
कोल्हापूर मंडळ एकूण ९२४ १,२८,७२३ ४,१५२
३५ औरंगाबाद ५३० २५,२३१ ३६५
३६ औरंगाबाद मनपा १,२५६ ६४,२८९ १,०६७
३७ जालना ५५४ २४,९०६ ४१८
३८ हिंगोली १९२ ७,५५३ ११४
३९ परभणी ४६५ ८,१८६ १९१
४० परभणी मनपा ४०६ ८,०४१ १७०
औरंगाबाद मंडळ एकूण ३,४०३ १,३८,२०६ ११ २,३२५
४१ लातूर ३८२ २७,२३३ ५०८
४२ लातूर मनपा २९३ ८,७८३ २६२
४३ उस्मानाबाद ४१९ २२,७३४ ६०१
४४ बीड ५०० २७,७१२ ११ ६४२
४५ नांदेड ६८९ १८,९४९ १३ ४५२
४६ नांदेड मनपा ६०० २९,४०१ १९ ४१६
लातूर मंडळ एकूण २,८८३ १,३४,८१२ ५५ २,८८१
४७ अकोला ७४ १०,९५४ १६६
४८ अकोला मनपा १५४ १८,८२० ३०७
४९ अमरावती १२७ १७,७२६ ३०७
५० अमरावती मनपा १०० ३२,३४७ ३५७
५१ यवतमाळ २७८ २९,४८२ ५६५
५२ बुलढाणा १,०१९ ३०,६०१ २९४
५३ वाशिम २२३ १७,३१२ १९३
अकोला मंडळ एकूण १,९७५ १,५७,२४२ १३ २,१८९
५४ नागपूर १,१४७ ४१,८३१ १३ ९५१
५५ नागपूर मनपा ३,१११ २,०४,४०८ १९ ३,१२०
५६ वर्धा ४२१ २२,७४३ ३८५
५७ भंडारा ८५६ २१,११६ ३२२
५८ गोंदिया ३१२ १६,९६० १८१
५९ चंद्रपूर २६३ १९,११२ २७१
६० चंद्रपूर मनपा १३६ ११,४४५ १७८
६१ गडचिरोली ५८ १०,३४६ ११०
नागपूर एकूण ६,३०४ ३,४७,९६१ ३४ ५,५१८
इतर राज्ये /देश १४६ १००
एकूण ५७,०७४ ३०,१०,५९७ २२२ ५५,८७८

आज नोंद झालेल्या एकूण २२२ मृत्यूंपैकी १२३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३८ मृत्यू, नागपूर-१३, नाशिक-१२, औरंगाबाद-३, अकोला-२, पुणे-२, वाशिम-२, बुलढाणा-१, धुळे -१, हिंगोली-१ आणि परभणी-१असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *