Breaking News

समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय; याच्यामागे कोण? याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा- नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय हे आता सिद्ध होतेय त्यामुळे याच्यामागे कोण आहे याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. काल गुजरातच्या द्वारका येथे ३५० कोटीचे ड्रग्ज सापडले आहे. त्याआधी मुंद्रा एअरपोर्टवर …

Read More »

PF व्याजाचे पैसे आले नाहीत तर येथे करा तक्रार १ मिनिटात जाणून घ्या तुमची शिल्लक

मुंबईः प्रतिनिधी सरकारने देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सरकार EPF बचतीवर ८.५ टक्के दराने व्याज देत आहे. व्याजाचे पैसे पीएफ खात्यात आले की नाही, ते तुम्ही घरी बसून पाहू शकता. याशिवाय जर तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली नसेल, तर …

Read More »

मुख्यमंत्री रूग्णालयात दाखल म्हणाले…म्हणलं तरी थोडसं दुर्लक्षच झालं केले आवाहन: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रकृतीसंदर्भात निवेदन

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात निवेदन केले असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. …

Read More »

फडणवीस-मलिकांच्या आरोप प्रत्यारोपावर संजय राऊत म्हणाले…आता हस्तक्षेपाची वेळ मलिक हे एका चीडीतून हे सगळं करतायत

मुंबई: प्रतिनिधी सध्या जे काही सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामीलाच हातभार लागत असून यात आता मोठ्याने हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे. तसेच या दोन्ही पैकी एका नेत्याने आता हे थाबविण्याची गरज आहे. मला माहित आहे की, नवाब मलिक यांच्या जावायावर झालेल्या कारवाईमुळे ते चिडीने हे सगळं करत आहेत. काल मी …

Read More »

न्यायालयाचे आदेश: वानखेडे आणि मलिक दोघांनीही आपले म्हणणे सिध्द करा अब्रु नुकसानीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरू वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात सातत्याने वक्तव्य करत असल्याप्रकरणी आणि जात प्रमाणपत्राबद्दल जाहीररित्या उल्लेख केल्याबद्दल दाखल करण्यात केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे आणि नवाब मलिक …

Read More »

मुंबई महापालिकेच्या निर्वाचित सदस्य संख्या वाढीसह मंत्रिमंडळाने घेतले हे ३ निर्णय महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता २३६ होणार

मुंबई: प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या २३६ अशी होणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (1888 चा 3) कलम ५ मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारी …

Read More »

पीएचडी-सेट-नेटधारकांसाठी खुषखबर: प्राध्यापक-प्राचार्य पदभरतीचा मार्ग मोकळा प्राध्यापकांची २०८८ तर प्राचार्यांची ३७० रिक्त पदे भरण्यास मान्यता- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील ३७० प्राचार्य व २०८८ सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य विषयक कारणास्तव प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

खराब CIBIL स्कोअरमुळे कर्ज मिळवण्यात अडचण, या मार्गांनी CIBIL सुधारा आणि मिळवा सहज कर्ज

मुंबई: प्रतिनिधी अनेकदा लोक गृहकर्ज, कार कर्ज किंवा इतर गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) घेतात. पण कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी चांगला CIBIL स्कोअर असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगला CIBIL स्कोअर तुम्हाला कमी व्याजदरात आणि सहज कर्जमिळवण्यास मदत करतो. तुमचा CIBIL स्कोर खराब होण्याची अनेक कारणे आहेत. आम्हीतुम्हाला या कारणांबद्दल आणि क्रेडिट स्कोअर कसा दुरुस्त करता येईल याबद्दल सांगत आहोत. या कारणांमुळे CIBIL स्कोअर खराब होतो – जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि ते वेळेवर भरले नाही तर तुमचा क्रेडिट स्कोर खराब होईल किंवा कमी होईल. – तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि तुम्ही बिल वेळेवर भरले नाही, तर त्याचा तुमच्या क्रेडिट – स्कोअरवर विपरीत परिणाम होतो. – तुम्ही तुमच्या बँक खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही किंवा त्यात उणे शिल्लक असली तरीही तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचा CIBIL स्कोर सुधारू शकता वेळेवर बिले आणि हप्ते भरा कर्ज किंवा इतर कोणतेही EMI आणि क्रेडिट कार्डची देय रक्कम आगाऊ परतफेड करणे आवश्यक आहे. ही सवय कायम ठेवल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारेल. त्याकडे दुर्लक्ष करू नका. क्रेडिट मर्यादेचा वापर जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड घेता तेव्हा खर्चावर मर्यादा असते. याला क्रेडिट मर्यादा म्हणतात. चांगला CIBIL स्कोअर राखण्यासाठी क्रेडिट मर्यादेच्या ३०% पेक्षा जास्त वापर केला जाऊ नये. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास, तुम्हाला क्रेडिट वापरकर्ता म्हणून पाहिले जाते. याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. कर्ज परतफेड ज्या व्यक्तीचा कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड चांगला असतो, त्याचा क्रेडिट स्कोरही तितकाच चांगला असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही अद्याप कोणतेही कर्ज घेतले नसेल, तर तुम्ही तुमच्या गरजांसाठी कर्ज घेऊ शकता. ते वेळेवर परत केल्यावरही तुमचा CIBIL स्कोर सुधारेल. चांगला CIBIL स्कोअर मिळविण्यासाठी कर्जाचा इतिहास चांगला असणे महत्त्वाचे आहे. यामध्ये विविध प्रकारचे कर्ज, सुरक्षित किंवा असुरक्षित, अल्पकालीन किंवा दीर्घ मुदतीचा समावेश असू शकतो. क्रेडिट कार्ड बंद करू नका तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड खाते बंद करणे टाळावे. त्यासोबत खरेदी करत रहा आणि तुमची बिले भरत राहा. याशिवाय तुम्ही तुमच्या संयुक्त खात्यातील खाती, CIBIL स्कोअर यांचे सतत पुनरावलोकन केले पाहिजे. संयुक्त कर्जाच्या बाबतीत, ग्राहक EMI भरण्यासाठी तितकाच जबाबदार असतो. याचा थेट परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. CIBIL स्कोअर ७५० किंवा त्याहून अधिक चांगला CIBIL स्कोअर ३०० ते ९०० गुणांपर्यंत असतो. जर गुण ७५० किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर कर्ज मिळणे सोपे आहे. CIBIL स्कोर जितका चांगला असेल तितके कर्ज मिळणे सोपे होईल. CIBIL स्कोअर २४ महिन्यांच्या क्रेडिट इतिहासावर आधारित आहे. CIBIL स्कोअर कशावर अवलंबून आहे? ३०% CIBIL स्कोअर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करत आहात की नाही यावर अवलंबून असतो. सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जावर २५%, क्रेडिट एक्सपोजरवर २५% आणि कर्जाच्या वापरावर २०% CIBIL स्कोअर कशावर अवलंबून असतो. Share on: WhatsApp

Read More »

गरिबांना लुटायचे आणि उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम इंधनदरवाढ, महागाई, बेरोजगारी, काळे कृषी कायदे या विरोधात १४ ते १९ नोव्हेंबर: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून गरिबांना लुटायचे आणि उद्योगमंत्री खिसे भरायचे हा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. याचाच परिणाम म्हणून देशात इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एकाबाजूला दरवाढ, महागाई आणि दुस-या बाजूला प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी व केंद्राचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे …

Read More »

मलिकांचे आरोप म्हणजे न शिजलेल्या “बिर्याणी” सारखे भाजपा नेते आशीष शेलार यांच्याकडून जोरदार पलटवार

मुंबई: प्रतिनिधी हायड्रोजन बाँम्ब सोडाच, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न म्हणजे बिरबलाच्या कथेप्रमाणे न शिजलेल्या “बिर्याणी” सारखा प्रकार आहे. नवाब मलिक यांनी मानसिक संतुलन सांभाळावे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार …

Read More »