Breaking News

जयंत पाटील म्हणाले, तर कायद्यातील सुधारणांमुळे कामगारांचे हक्क कमी… राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचा कार्यकर्ता मेळावा...

आज देश पातळीवर कामगारांविषयी जे धोरण आखले जात आहे त्या धोरणांनुसार कामगारांचे संरक्षण कसे टिकवायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. देशाच्या कामगार कायद्यात सुधारणा करण्याच्या नावावर जो बदल केला जात आहे त्यामुळे कामगारांचे हक्क कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. याने इथल्या शोषित बांधवांचे नुकसान होणार आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी …

Read More »

पशुधनाला लम्पीची लागण झाली? मग मंत्रालयातील ‘या’ नंबरवर संपर्क साधा मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना- प्रधान सचिव जे. पी. गुप्ता

राज्यात लम्पी चर्मरोगाचा होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंपी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी दिली. समन्वय कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८४५१३२ गुप्ता म्हणाले,राज्यात …

Read More »

निवडूण आलेल्या महिलांची ग्वाही, आम्हीही देऊ गावाच्या विकासात योगदान ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या प्रशिक्षणानंतरच्या भावना

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हीही गावाच्या विकासात योगदान देऊ शकतो आणि डिजिटल कारभारातही आम्ही मागे राहणार नाही. सरपंचासाठी असलेल्या डिजिटल सहीचा दक्षतापूर्व व प्रभावीपणे वापर करु, असा विश्वास राज्यातील ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणानंतर अनेक महिला सदस्यांनी व्यक्त केला. विविध जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतीच्या जानेवारी २०२१ मध्ये निवडणुका पार पडल्या. यात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, मुंबईत नेत्रविकारांसाठी विशेष रुग्णालय मुंबईकरांना दर्जेदार वैद्यकीय उपचारासाठी आरोग्य सुविधांचा पुनर्विकास जलदगतीने करावा

मुंबईकरांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी उपलब्ध आरोग्य सुविधांचा पुनर्विकास जलदगतीने करण्यात यावा. मुंबईत नेत्र विकारांसाठी विशेष रुग्णालय करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुंबईत सध्या महापालिकेमार्फत १९ उपनगरीय रुग्णालयांचे बांधकाम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. देशभरातून कर्करोगाच्या उपचारासाठी मोठ्यासंख्येने रुग्ण येथील …

Read More »

सचिन सावंत म्हणाले,…गुजरातला नेण्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान तळेगावमध्ये होणारा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प केवळ केंद्र सरकारच्या दबावामुळे गुजरातला

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाराष्ट्राने गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देऊनही हा प्रकल्प गुजरातमधील ढोलेरा येथे जातो हे केवळ केंद्र सरकारच्या दबावाखाली झालेले आहे. ढोलेरा हे अव्यवहार्य ठिकाण असल्याने आय. एस. एम. सी. डिजिटल (ISMC Digital) या सेमीकंडक्टरच बनविणाऱ्या कंपनीसहीत अनेक कंपन्यांनी तिथून काढता पाय घेतला असल्याने वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प ढोलेराला नेण्याने …

Read More »

‘कांद्याचे भाव कोसळले’ मुख्यमंत्री शिंदे यांनी लिहिले केंद्रीय मंत्री गोयल यांना पत्र नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

काद्यांचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.  त्यामुळे नाफेडमार्फत आणखी २ लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्वारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियूष गोयल यांना केली आहे.. या संदर्भामध्ये …

Read More »

काँग्रेसचा सवाल, फॉक्सकॉनचा… तर हाय पॉवर कमिटीची बैठक का झाली ? वेदांताचे प्रमुख अग्रवाल यांचे विधान राजकीय दबावाखाली वदवून घेतले आहे का?

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये पळवल्यावरून महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे हे सरकार घाबरले असून डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून शिंदे फडणवीस सरकारकडून याचे खापर मविआ सरकारवर फोडले जात आहे. दुसरीकडे हा प्रकल्प गुजरात राज्यात नेण्याचा निर्णय आधीच झाला होता असे विधान वेदांताचे प्रमुख अग्रवाल …

Read More »

धक्कादायकः शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाने मंजूरी न दिल्यानेच वेदांता-फॉक्सकॉन गुजरातला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी न दिल्यानेच प्रकल्प गेला

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले. या दोन मंत्र्यांचेच मंत्रिमंडळ राज्यात तब्बल ३९ दिवस अस्तित्वात होते. या काळात अनेक महाविकास आघाडीच्या काळात रखडलेले निर्णय शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात राज्य मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आले. त्यातीलच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पांना देण्यात येणाऱ्या सबसिडी आणि सवलतींचा प्रस्ताव दोनदा पाठविण्यात …

Read More »

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राला आर्थिक मागास बनविण्यासाठीच प्रकल्प गुजरातला राज्यसरकारने तात्काळ हस्तक्षेप करुन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा;विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र राज्यासाठी महत्वपूर्ण असणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प तळेगाव एमआयडीसीत साकारण्यात येणार होता. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले होते, त्यादृष्टीने सर्व पुर्तता करण्यात आली होती. मात्र दोन लाख कोटींची गुंतवणुक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा महत्वपूर्ण प्रकल्प गुजरातमध्ये …

Read More »

उदय सामंत यांचा आदित्य ठाकरेंना सवाल, मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही? नाणार रिफायनरीची ३.५ लाख कोटींची गुंतवणूक तरी गांभीर्याने घ्या!

फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, अशी मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी करतानाच आता तरी त्यापेक्षा दुपटीहून अधिक गुंतवणूक असलेल्या रिफायनरीच्या गुंतवणुकीत खोडा घालू नये, अशी विनंती केली आहे. …

Read More »