Breaking News

चोकलिंगम यांची माहिती, दुसऱ्या टप्प्यासाठी दोन मतदान यंत्रे तर अकोल्यात मात्र एक

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मतदारांनी चांगला सहभाग नोंदवत मतदान केले असून निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. दुसऱ्या टप्प्यातील २६ एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज असल्याची …

Read More »

अमित शाह यांचे शरद पवार यांना आव्हान

अमरावतीच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याबद्दल अमरावतीकरांची माफी मागण्याऐवजी,केंद्रात कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांसाठी, विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी काहीच न केल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांची माफी मागून प्रायश्चित्त घ्या, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी अमरावती येथील जाहीर विजय संकल्प सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिले. अमरावती …

Read More »

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर बोरघाटात आणि समतल भागात या वेगाने वाहने चालवा

वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि कामाच्या निमित्ताने पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होत आहे. त्यातच बोरघाट आणि समतल भागात प्रवासी वाहनांचा वेग आधीच निश्चित केला असल्याने अनेक वाहनांचा अपघात घडल्याचे आणि त्या अपघातातून अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसच्या वाहतूक शाखेकडून …

Read More »

नाना पटोले यांची घोषणा, विधान परिषदेची कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार

आगामी विधान परिषद कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार दिला जाईल. मागील काही महिन्यांपासून काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागात पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, माकपासह इतर मित्रपक्ष यांची महाविकास …

Read More »

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला

सध्या देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्स मॅनेज करता येऊ शकते असा दावा करत यापुढे सर्व मतदारसंघात ईव्हीएम मशिन्ससोबत व्हीव्हीपॅटही ठेवावी आणि व्हीव्हीपॅट मशिन्सच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या मतदारांनी मतदान केलेल्या स्लिपही मतदानाबरोबर मोजावीत याप्रकरणी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर पहिली सुनावणी घेतल्यानंतर …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी काँग्रेस प्रणित युपीए सरकारने शिक्षण हक्क कायदा केला. भाजपाप्रणित शिंदे सरकारने मात्र या कायद्यात मनमानी व बेकायदेशीर बदल करून वंचित व दुर्बल घटकांतील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आणली आहे. गोरगरीब, वंचित आणि बहुजन …

Read More »

शरद पवार यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे लबाडाघरचं आवताण…

सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही. १० वर्षांत स्वतः काही केले नाही, आणि हिशेब आम्हाला मागतात. मोदींनी गेल्या दहा वर्षात एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. लबाडाच्या घरचे अवताण जेवल्याशिवाय खरं नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. माढा लोकसभा मतदारसंघात …

Read More »

अक्षयतृतीयेच्या तोंडावर सोने दरात घसरण भारतीय सोने बाजारावर काळजीचे वातावरण

इराण आणि इस्रायल या दोघांनी अतिरिक्त ड्रोन हल्ल्यांपासून दूर राहिल्यामुळे आठवड्याच्या शेवटी पश्चिम आशियातील तणाव शिथिल झाल्यानंतर मंगळवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. युद्धाच्या धमक्या कमी करण्याबरोबरच, अलीकडील किंमतीतील वाढ आणि यूएस अर्थव्यवस्थेतील पुनरुत्थानानंतर प्रचंड नफा वसुली यामुळेही सोन्याच्या किमतीवर घसरणीचा दबाव आला. मंगळवारी सोन्याचा भाव ₹१,२७७ प्रति १० ग्रॅम घसरून …

Read More »

भारत पे ने लाँच केले ऑल इन वन अॅप मनी ट्रान्सफरचे कोणत्याही अॅपवर पाठविणार पैसे

भारतीय फिनटेक प्रमुख भारत पे BharatPe ने मंगळवारी भारत पे वन BharatPe One लाँच केले, एक सर्व-इन-वन पेमेंट उत्पादन जे POS (पॉईंट ऑफ सेल), QR कोड आणि स्पीकर एका उपकरणात एकत्रित करते. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की पहिल्या टप्प्यात सुमारे १०० शहरांमध्ये हे उत्पादन लॉन्च करण्याची त्यांची योजना आहे. …

Read More »

Razorpayनेही आता एअरटेलबरोबर जारी केले युपीआय स्वीच कंपनीने जारी केलेल्या पत्रकातून माहिती

फिनटेक Fintech युनिकॉर्न रझोरपे Razorpay ने आज सांगितले की ते स्वतःचे UPI इन्फ्रास्ट्रक्चर लाँच करत आहे. यूपीआय स्विच नावाचे, हे उत्पादन, जे एअरटेल पेमेंट्स बँकेच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे, क्लाउड-आधारित असेल आणि यश दर ४-५% वाढविण्यासाठी आणि प्रति सेकंद १०,००० व्यवहार (TPS) पर्यंत व्यवस्थापित करण्यासाठी डिझाइन केले आहे. कंपनीच्या …

Read More »