Breaking News

Editor

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला वेटलिफ्टींगमध्ये पहिले रौप्यपदक उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या ४९ किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. मीराबाई चानू यांनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मिळवलेलं यश भारतीय संघातील अन्य खेळाडूंना उत्तम कामगिरी …

Read More »

अतिवृष्टीचा फटका ८९० गावांना: जाणून घ्या कोठे किती मृत्यू आणि स्थलांतरीतांची संख्या अद्यापही ५९ अद्यापही बेपत्ता ७६ मृत्यू; सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

मुंबई : प्रतिनिधी सततच्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी- रायगडसह ९ जिल्ह्यात झालेल्या पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये एकूण ७६ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही ५९ नागरीक बेपत्ता आहेत. यापैकी सर्वाधिक नागरीत रायगड जिल्ह्यातील आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून ९ जिल्ह्यातील जवळपास ९० हजार नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने …

Read More »

आपत्तीग्रस्तांना केरोसीनसह मोफत अन्नधान्याचे वितरण; तात्काळ पंचनामे करा मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आदेश

नाशिक : प्रतिनिधी  महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. …

Read More »

दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा आधार, “तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करणार असल्याची दिली ग्वाही

महाड (तळीये) : प्रतिनिधी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या तळीये गावावर काल अतिवृष्टीने दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४० जणांना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. काल संध्याकाळपर्यंत जवळपास ३७ जणांचे मृतदेह ढिगाऱ्यांखालून काढण्यात आले. त्यात  आज आणखी वाढ होवून ही संख्या ४० वर पोहोचली. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज येथे आले. …

Read More »

कोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात जवळपास ४ आठवड्यानंतर पुन्हा ६ हजार ७५३ वर रूग्णसंख्या आली आहे. एक महिन्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र ही संख्या ६ हजाराहून खाली आलेली नाही. तसेच मुंबईतील रूग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणावर घट झाली असून ३७३ इतकी रूग्ण संख्या आज नोंदविण्यात आली आहे. …

Read More »

दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत द्यायचीय तर या क्रमांकावर संपर्क साधा : या ठिकाणी कोसळल्या दरडी नागरिकांना जीवनावश्यक साहित्यासाठी मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी खाद्यपदार्थ, पाणी बॉटल्स, बिस्कीट, दूध पॉकेट, कपडे, चादर-बेड शीट, सतरंजी व इतर जीवन उपयोगी साहित्य स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, व्यापारी, उद्योगपती व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पाठवावयाचे असल्यास माणगाव येथील पुढील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात …

Read More »

पूर परिस्थितीतील मदत आणि गणेशोत्सवासाठी अजून ४० रेल्वे गाड्या रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोकणातील पूर परिस्थितीतून मार्ग काढून रेल्वे लवकरात लवकर सुरु कशी करता येईल जेणेकरून मदत कार्याला वेग येईल.. याबाबत तातडीने आढावा घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना करतानाच गणेशोत्सवासाठी अजून ४० गाड्यांचे नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केली. भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांच्यासह खासदार …

Read More »

महाडग्रस्तांसाठी अन्नाची पाकिटे, कपडे पाठवा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुटका करणे सुरु : दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखाची मदत

मुंबई : प्रतिनिधी महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची …

Read More »

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी २७ जुलै रोजी होणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित …

Read More »

सैन्यदलाची मदत मिळणार: पालकमंत्री, लोकप्रतिनिधींनो जिल्हा सोडू नका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती आणि सूचना

मुंबई : प्रतिनिधी रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »