Breaking News

Editor

पूर परिस्थितीतील मदत आणि गणेशोत्सवासाठी अजून ४० रेल्वे गाड्या रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोकणातील पूर परिस्थितीतून मार्ग काढून रेल्वे लवकरात लवकर सुरु कशी करता येईल जेणेकरून मदत कार्याला वेग येईल.. याबाबत तातडीने आढावा घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना करतानाच गणेशोत्सवासाठी अजून ४० गाड्यांचे नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केली. भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांच्यासह खासदार …

Read More »

महाडग्रस्तांसाठी अन्नाची पाकिटे, कपडे पाठवा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुटका करणे सुरु : दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखाची मदत

मुंबई : प्रतिनिधी महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची …

Read More »

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी २७ जुलै रोजी होणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित …

Read More »

सैन्यदलाची मदत मिळणार: पालकमंत्री, लोकप्रतिनिधींनो जिल्हा सोडू नका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती आणि सूचना

मुंबई : प्रतिनिधी रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

पूरग्रस्त, डोंगरउतारावरची गावे, वस्त्यांमधील रहिवाशांसाठी एनडीआरएफच्या १४ टीम सक्रिय मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षातून घेतला राज्यातील आपत्तीचा आढावा

मुंबई : प्रतिनिधी कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला. तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दरड कोसळण्याच्या झालेल्या दोन दुर्घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त करून डोंगर उतारांवरील गावे व वस्त्या …

Read More »

पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना दिल्या अनोख्या शैलीत शुभेच्छा अनिश्चित काळासाठी बंद ठेवणार का? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

पुणे: प्रतिनिधी कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी महाविकास आघाडी सरकारला केला. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना योग्य काळजी घेऊन व्यवहार करण्याची परवानगी सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी गुरुवारी केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री …

Read More »

५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता मोठया प्रमाणावर निर्माण होत आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या काळात ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक करण्यात आल्याचे वैद्यकीय …

Read More »

परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल ८ पैकी २ पोलिस अधिकाऱ्यांना अटक बाकिच्यांनाही लवकरच अटक

मुंबई: प्रतिनिधी १०० कोटी रूपये खंडणी वसुलीप्रकरणी आरोप करून चर्चेत आलेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुली आणि मालमत्ता अपहारप्रकरणी मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच त्यांच्यासह आठजणांहून अधिक पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आल्याने परमबीर सिंग यांना केव्हाही अटक होवू शकते अशी चर्चा पोलिस …

Read More »

भाजपाच्या त्या १२ आमदारांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव वर्षभरासाठी निलंबित करण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात धाव घेतली

नवी दिल्ली: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे संपुष्टात आलेले आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक असलेली माहिती केंद्रातील भाजपा सरकारने द्यावी असा ठराव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेत राज्य सरकारने मांडला. त्यावेळी वेळी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याबरोबर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजपा आमदारांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल १२ जणांना वर्षभरासाठी निलंबित केल्याप्रकरणी भाजपाच्या त्या …

Read More »

पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा केंद्र सरकारविरोधात काँग्रेस नेत्यांची राजभवनसमोर निदर्शने, राज्यपालांना निवेदन सादर

मुंबई: प्रतिनिधी देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅक करून हेरगिरी केली जात आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सहकारी, इतर विरोधी पक्षांचे नेते यांचीही हेरगिरी करण्यात आलेली आहे. संविधानाने दिलेल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारावरचा हा हल्ला तर आहेच, परंतु लोकशाही …

Read More »