Breaking News

Editor

अजित पवार म्हणाले, मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भाग मात्र जरा भान ठेवलं असत तर… केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर तिरकस टीका

पुणे: प्रतिनिधी प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. राज्यात त्या चार जणांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर सांगितलं फिरा. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भाग आहे. पण प्रत्येकाने भान ठेवलं असतं तर हि वेळ आली नसती असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांचे नाव न घेता लगावला. …

Read More »

कोविडच्या संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी १३६७.६६ कोटी रुपयांची तरतूद सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने १३६७.६६ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. कोविड प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या या विशेष तरतुदीमुळे अत्यावश्यक गोष्टींसाठी विविध उपाययोजना आखण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी …

Read More »

उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे-भाजपा नेते आशिष शेलार यांची टीका

रत्नागिरी: प्रतिनिधी ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उध्दव ठाकरे हे असून त्यांची शिवसेना कोकण विरोधी असल्याचा आरोप भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी रत्नागिरी येथे केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून रत्नागिरीतून पुन्हा सुरुवात झाली …

Read More »

गृहनिर्माण मंत्री आव्हाडांनी घेतलेल्या निर्णयावर पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंचे ओव्हर रूल झोपडपट्टी पुनर्वसनातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

मुंबई : विशेष प्रतिनिधी शहरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांचे काम एसआरए हाती घेईल आणि ते प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा साधापणत: तीन आठवड्यांपूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यास आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ओव्हर रूल केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. साधारणत: तीन आठवड्यापूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र …

Read More »

वकिलांची चांगली फौज, अनिल परबांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा

सांगली: प्रतिनिधी हे सरकार पोलीस आणि गुंडांच्या जोरावर चाललंय, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत आपल्याकडे वकिलांची चांगली फौज असून ते सतत कायद्याची सविस्तर माहिती घेवून त्यानुसार न्यायालयीन लढ्यासाठी मदत करत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार सारखं न्यायालयाकडून थपडा खात असून परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं …

Read More »

पाठी लागू नका मी बोलायला लागलो तर सगळचं अवघड होईल चीवचीव सेना पुन्हा घरावर चालून आली तर त्यांचा योग्य सन्मान करू

रत्नागिरी: प्रतिनिधी मुंबई आणि कोकणात सुरु असलेल्या जन आर्शिवाद यात्रेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यामुळे आलो आहे. या यात्रे दरम्यान काही घटना घडल्या. त्याचा सगळाच उल्लेख मी करत नाही. मात्र माझ्यावर झालेली कारवाई ही बेकायदेशीर असून एखाद्या दरोडेखोराप्रमाणे माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. नारायण राणेच्या पाठी जास्त लागू नका नाही …

Read More »

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वांचेच एकमत: अंतिम निर्णय येत्या ७ दिवसानंतर प्राप्त सूचना, उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करून शुक्रवारी पुन्हा बैठक

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या …

Read More »

महाराष्ट्र प्रदेशची काँग्रेसची कार्यकारणी आणि १४ जिल्हा व ग्रामीणचे अध्यक्ष अखेर जाहीर १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सचिव, ६ प्रवक्ते कायम

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसची कार्यकारणीत कोणा कोणाचा समावेश होणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यानुसार आज काँग्रेसच्या केंद्रीय समितीने महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेस कार्यकारणीतील नावांना मंजूरी दिली असून यासंबधीची यादीही जाहीर केली. या कार्यकारणीत १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सचिव, १ खजिनदार आदींसह कार्यकारणी सदस्य आणि १४ …

Read More »

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख बाधित झाले आणि तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  त्यात १२ टक्के लोकांना ऑक्सिजन लागतो. गेल्या वेळी एका वेळी साडेसहा लाख ॲक्टिव्ह रुग्ण होते, आता १३ लाख ॲक्टिव्ह …

Read More »

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदला वाढीसह मंत्रिमंडळाने घेतले हे महत्वाचे निर्णय निधी वितरणातील सुसूत्रता, अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहने, न्यायाधीशांना सुधारीत वेतनश्रेणी

मुंबई: प्रतिनिधी आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कोरोना महामारी सुरु असेपर्यन्त आशा स्वयंसेविका व आशा गटप्रर्वतक यांना  दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य शासनाच्या निधीतून अदा …

Read More »