Breaking News

Editor

लोकल प्रवासासाठी लसप्रमाणपत्राची पडताळणी करायचीय, मग या सोप्या गोष्टी करा मुंबई महापालिकेने कडून १०९ स्थानकांवर केली ऑफलाईन तपासणी सुविधा

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानुसार, नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया उद्या बुधवार ११ ऑगस्ट २०२१ …

Read More »

शाळांबाबत अखेर आदेश जारी: १७ ऑगस्टपासून हे वर्ग सुरु होणार शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शाळा १७ ऑगस्टपासून करण्याचा विचार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. त्या अनुषंगाने आज अखेर शासन निर्णय जारी करत चला मुलांनो शाळेत चला या अभियानातंर्गत ग्रामीण भागात ५ ते ७ वी आणि शहरी भागात ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु …

Read More »

चंद्रकांत पाटील यांनी केला दिल्ली दौऱ्याचा खुलासा म्हणाले… प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी उपयुक्त

मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या नेत्यांचे शिष्टमंडळ पक्षाच्या पूर्वनियोजित योजनेनुसार आपल्या नेतृत्वाखाली तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले व त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय संघटनमंत्री संतोष यांच्यासह भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. राज्यातील संघटनात्मक कार्य आणि विकासकामांच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत उपयुक्त ठऱला. तथापि, पक्ष संघटनेत मोठे बदल करण्याची …

Read More »

ओबीसीप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले हे आश्वासन इतर मागास वर्गाचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्यासंदर्भात कार्यवाहीचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी इतर मागास वर्ग समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी राज्य शासन वचनबध्द असून, त्यांच्यासाठी निधी देताना हात आखडता घेतला जाणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीत संबंधित सचिवांनी तत्काळ कार्यवाही करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने त्यांच्याकडील इम्पेरिकल डाटा राज्याला …

Read More »

ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा द्या; ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची लोकसभेत जोरदार मागणी

नवी दिल्ली: प्रतिनिधी ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्र सरकारने न्यायालयात सादर करण्यासाठी इम्पिरिकल डेटा द्यावा आणि केंद्र सरकारने नव्याने आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देणारे विधेयक आणले तरी ५० टक्के आरक्षणाच्या अटीमुळे हा अधिकार देवूनही मागास समाजांना आरक्षण देता येणार नसल्याने ही अट काढून टाकावी अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार …

Read More »

११ वी प्रवेशाची सीईटी रद्द केल्याचे आदेश ४८ तासात काढा, न्यायालयाचे आदेश १० वीच्या गुणांवरच ११ वीला प्रवेश द्या राज्य सरकारला निर्देश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील १० वी च्या विद्यार्थ्यांना ११ वीत प्रवेश घेण्यासाठी सीईटीची परिक्षा देण्याचा पर्याय राज्य सरकारने ठेवला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्ष परिक्षा घेणे धोक्याचे असून १० वी परिक्षेत मिळालेल्या मार्कावरच ११ वीला प्रवेश देण्यात यावा असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने देत प्रवेशासाठी असलेली सीईटीची परिक्षा …

Read More »

… तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन ही हेरगिरी केली ? राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी पेगॅसस स्पायवेअर’ची निर्मिती करणारी इस्त्रायली कंपनी ‘एनएसओ’ सोबत कोणताही व्यवहार झालेला नाही असे संरक्षण मंत्रालय सांगत असेल तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन ही हेरगिरी केली. ही घटना अधिक गंभीर असून याच्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ चौकशी समिती नेमावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि …

Read More »

आगामी निवडणूकातील युती-आघाड्याबाबत मलिक यांनी केले महत्वाचे विधान एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही

मुंबई: प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. तिथले स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणूका होणार आहेत. …

Read More »

कलासक्त मुख्यमंत्री तरी २४ वर्षे लढा देणाऱ्या जे.जे च्या त्या ११ शिक्षकांना न्याय देणार का? न्यायालयाने दोनवेळा आदेश देवूनही शिक्षक कंत्राटावरच

मुंबई: प्रतिनिधी भारतासह देश विदेशात चित्रकला, शिल्पकला, पेंटींग आदी क्षेत्रात जे.जे.स्कूल ऑफ आर्ट या संस्थेतून अनेक विद्यार्थी बाहेर पडले आणि त्यांचे नाव झाले. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आकार देणाऱ्या ११ शिक्षकांवर आपल्या न्याय हक्कासाठी २४ वर्षापासून लढा सुरु ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र मंत्रालयातल्या झारीतील शुक्रचार्यांकडून यात सातत्याने अडथळा आणला जात …

Read More »

रखडलेल्या प्रकल्पांचा पुनर्विकासाचे भवितव्य आता एसआरए आणि म्हाडाच्या हाती स्वत: विकसित करणार-गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड असल्याची माहिती

मुंबई : प्रतिनिधी अनेक बँकांनी तसेच वित्तीय संस्थांनी आशयपत्र (LOI) बघून विकासकांना पैसे दिलेले आहेत. खरंतर आशयपत्र (LOI) बघितल्यानंतर वित्तीय संस्थांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे संपर्क साधणे गरजेचे होते आणि मगच पैसे द्यायला हवे होते. परंतु तसे झाले नाही. करोडो रुपये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये गुंतविण्यात आले आहेत तथाप‍ि आशयपत्राच्या पुढे विकासकाने कुठलेही काम …

Read More »