Breaking News

अजित पवार म्हणाले, मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भाग मात्र जरा भान ठेवलं असत तर… केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर तिरकस टीका

पुणे: प्रतिनिधी

प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. राज्यात त्या चार जणांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर सांगितलं फिरा. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भाग आहे. पण प्रत्येकाने भान ठेवलं असतं तर हि वेळ आली नसती असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

पुण्यातील कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.

पोलिसांनी लगेच कोणती कारवाई केली नव्हती. त्यांचे काही लोकं कोर्टात गेलं आणि कोर्टानं नाकारलं. हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. ते झाल्यानंतर पुढच्या गोष्टी घडल्याचे त्यांनी सांगितले.

नारायण राणे यांच्याकडे असलेल्या खात्याकडून राज्याला काही निधी मिळू शकेल का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकते. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. काम पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातेही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत. आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेता येत असावा, असं वाटतं असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी राणे यांना लगावला.

राज्यात ऑक्सिजन ७०० मेट्रिक टनापेक्षा जास्त लागला तर कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा देत आता २०० मेट्रिक टन ऑक्सीजन लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

शंभूराज देसाई यांची घोषणा, राज्य उत्पादन शुल्क विभागात लवकरच भरती विभागाची रिक्त पदे लवकरच भरू

महाराष्ट्राचा राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा विभाग आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published.