Breaking News

Editor

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून गेल्याने तर्क –वितर्कांना उधाण

मुंबई: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठक अर्धवट सोडून थेट ब्रीच कॅण्डीत दाखल झाले. त्यांच्या विविध तपासण्या करण्यात येत असून त्यानंतर जयंत पाटील यांना अॅडमिट करायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जयंत पाटील …

Read More »

ठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँक, लक्ष्मी विलास आणि येस बँक आर्थिक घोटाळ्यामुळे गाळात आल्याने अनेक ठेवीदारांचे मोठ्या प्रमाणावर पैसे बुडाले. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या डिआयसीजीसी कायद्याखाली आता ठेवीदारांना त्यांच्या पैशाचे विमा संरक्षण मिळणार असून बँक बुडाली तर ९० दिवसात ५ लाख रूपये ठेवीदारास मिळणार असल्याची माहिती केंद्रीय …

Read More »

पुरग्रस्तांसाठी अखेर भाजपा आमदारांचे वेतन महाराष्ट्राच्या खात्यात भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला-अॅड. शेलार

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतर या विषाणूचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवाहन करत राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीत देणगी देण्याचे आवाहन केले. मात्र भाजपाच्या सर्व आमदारांनी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत देणगी जमा करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या पंतप्रधान केअर फंडला एक …

Read More »

अजित पवारांचे आदेश: एमपीएससीमार्फत नोकर भरती होणार, रिक्त पदांची माहिती पाठवा शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : विषेश प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून ४ मे २०२१ आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून सूट देत ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार …

Read More »

होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही देताना राज्यात शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. मंत्रालयात होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत बैठक झाली. यावेळी आमदार विक्रम काळे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.रामास्वामी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ.उत्तुरे, …

Read More »

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, पूरग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळेल नागरिकांना तातडीने शासकीय मदत देण्याचे निर्देश

अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर संकट कोसळले, मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. चिपळूण येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्यपाल कोश्यारी चिपळूण दौऱ्यावर आले होते, त्यावेळी …

Read More »

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर ! विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण सारथी संस्थेचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी मराठा,कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत प्रायोजित केले आहे. विद्यार्थ्यांना दरमाह ८००० रूपये विद्यावेतन आणि प्रशिक्षणाचे संपुर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देण्यात येणार असून, प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतीम …

Read More »

पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेगॅसस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी राज्यातील २०१७ सालचे फोन टॅपिंग व पेगॅसस हेरगिरीचा संबंध आहे का ?-नाना पटोले

मुंबईः प्रतिनिधी पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील महत्वाचे राजकीय नेते, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन हॅक करण्यात आले आहेत. या लोकांवर हॅकिंगच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशी आदेश अद्याप दिले नसले तरी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने या हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक …

Read More »

पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरून शरद पवारांचा नेमका कोणाला टोला ? पूरग्रस्तभागात ग्राऊंडवर काम करणाऱ्यांचे लक्ष विचलित होईल असे इतरांनी दौरे करु नयेत - शरद पवार

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एखादी आपत्ती आल्यानंतर त्या भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी दौरे करुन लोकांना दिलासा देण्यासाठी लक्ष घालणे योग्य ठरते. आता स्थानिक प्रशासन, तेथील संघटना आणि कार्यकर्ते पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे इतर लोकांनी पूरग्रस्त …

Read More »

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून देण्याची तत्परता दाखविण्यासाठी समिती नेमणा-या ठाकरे सरकारने पूरग्रस्त भागातील जनतेच्या भावनांची कुचेष्टा केली असून संकटग्रस्त जनतेच्या हितापेक्षा कर्जबुडव्यांबद्दल कळवळा दाखविणारे ठाकरे सरकार ढोंगी आहे. कर्जबुडव्या बड्या धेंडांसाठी पायघड्या घालत सामान्य संकटग्रस्तांसमोर आर्थिक अडचणीचे पाढे वाचणाऱ्या …

Read More »