Breaking News

Editor

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाण्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकाराण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी “माझे ठाणे” ही भावना मनात ठेवून ठाण्याच्या विकासासाठी उत्कृष्ट दर्जाचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, सीमाप्रश्नी मुख्यमंत्री शांत का?

दिवसेंदिवस कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करत असून आधी सीमावर्ती भागातील गावांवर दावा सांगितला. त्यानंतर सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी येवू नये यासाठी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिले. तर दुसऱ्याबाजूला सोलापूरात कर्नाटक भवनची आवश्यकता नसताना सोलापूरात कर्नाटक भवन उभारणार असल्याची घोषणा करत सीमाप्रश्नी वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरु आहे. …

Read More »

उच्च न्यायालयाचा दणका, शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थगितीलाच स्थगिती

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. सत्तेत स्थानापन्न होताच शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या अनेक कामांना आणि निधी वाटपांना स्थगिती दिली. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात बेलेवाडी पंचायतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने …

Read More »

उदयनराजे यांच्या त्या वक्तव्यावर उध्दव ठाकरे म्हणाले, उदयनराजेंच धन्यवाद..

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. उदयनराजे यांच्या नेतृत्वात आज (३ नोव्हेंबर) किल्ले रायगड येथे निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा बोलताना ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे दोषी आहेत,’ असा हल्लाबोल उदयनराजेंनी केला. उदयनराजेंच्या …

Read More »

उदयनराजे भोसले म्हणाले, राज्यपालांची हकालपट्टी का झाली नाही याचे उत्तर भाजपाने द्यावे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी आज किल्ले रायगडावर उदयनराजे यांनी निर्धार शिवसन्मानाचा या कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना …

Read More »

मंत्री लोढा म्हणतात राज्य सरकार ७५ हजार तर कौशल्य विकास ५ लाख जणांना नोकऱ्या देणार

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी सहभाग घेऊन ८ हजार ४४८ रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात …

Read More »

प्लास्टीकवरील बंदी शिथील, या गोष्टी आता वापरण्यास परवानगी

महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनविण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार …

Read More »

केंद्रीय ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहिर

हंसराज अहीर यांनी आज केंद्रीय मागासवर्ग अर्थात ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे, केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर म्हणाले. आज केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार हंसराज अहीर यांनी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयात स्वीकारला. पदभार स्विकारल्यानंतर ते माध्यमांशी बोलत …

Read More »

६ डिसेंबरसाठी आंबेडकरी अनुयायांसाठी शिवाजी पार्कात ५० हजार चौरस.फु. वॉटरप्रुफ मंडप

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या सोयीसाठी राज्य शासन, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस यंत्रणा सज्ज आहे. डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. अनुयायांनी …

Read More »

आता आशिष शेलारांच्या आरोपांना शिंदे-फडणवीस सरकारकडून केराची टोपली

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत असताना भाजपाचे नेत्या चित्रा वाघ यांनी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. त्यानंतर भाजपाचे नेते तथा विद्यमान प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीतील पाच मंत्र्यांकडील कथित स्पेशल व्यक्तींची नावे घेत आरोप ऐन पावसाळी …

Read More »