Breaking News

Editor

एका लुटारुला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर आधी मुख्यमंत्र्य़ांनी राजीनामा द्यावा

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निती आयोगासारखीच महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच ‘मित्र’ची स्थापन करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने करून चुकीचा पायंडा पाडला आहे. अजय आशर सारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

सुषमा अंधारे यांचा राज ठाकरेंवर टीकास्त्र, आमच्याकडे एक असा पठ्ठ्या..

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मागील काही दिवसांपासून प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने बंडखोर शिंदे गटावर सातत्याने टीकेची झोड उठविली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी आता मनसेकडे आपला निशाना वळवित थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ …

Read More »

पोलिस दलातील पदांसाठी तुम्ही शाररिक चाचणी परिक्षा दिलीय का? मग ही बातमी वाचाच

पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणी नंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या २५० पदांवर पदोन्नती देण्याकरीता विभागीय स्पर्धा परीक्षेतील …

Read More »

बच्चन यांच्या दिवार चित्रपटाप्रमाणे त्यांच्या कपाळावर गद्दार असा शिक्का

शिवसेनेत बंडखोरी करून वेगळी चूल मांडणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांवर उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज निशाणा साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, जे आमदार खासदार शिवसेना सोडून गेले त्यांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे. ज्याप्रकारे दिवार सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’, असे लिहिले …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०३२ अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान

राज्य शासनाच्या विविध विभागातील नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्राचा ‘महासंकल्प’ कार्यक्रमानिमित्त जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि मृद व जलसंधारण …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर जयसिंगराव पवार यांचा मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आवाज असलेला सरसेनापती प्रताप गुर्जर यांच्यावर आधारीत हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी स्वत: राज ठाकरे यांनी प्रयत्न केले. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटावर सर्वचस्तरातून टीकेचा मारा सुरु झाला. त्यामुळे या चित्रपटाच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी कोल्हापूर दौऱ्यात …

Read More »

सीमावासिय परराज्यात जाण्यासाठी उत्सुक तर राज्य सरकार सीमा भागातील बांधवांच्या पाठीशी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील २८ गावांवर दावा सांगितल्यानंतर लगेच सोलापूर जिल्ह्यातील गावांवरही दावा सांगितला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील २८ गावांनी, नांदेड जिल्ह्यातील काही गावांनी आणि गुजरातला लागून असलेल्या सीमावर्ती भागातील अनेक नागरीकांनी गुजरातमध्ये जाण्याबाबतची भूमिका मांडण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर विकासाची गंगा आमच्यापर्यत पोहोचत …

Read More »

शिधापत्रिका धारकांचे आधार बँक खात्याला जोडण्यात हे दोन जिल्हे राज्यात प्रथम

शिधापत्रिका धारकांचे आधारकार्ड बँक खात्याला जोडण्याचे (आधार सिडींग) कार्यक्षेत्रानुसार १०० टक्के कामकाज पूर्ण करण्यात पुणे विभागातील पुणे व सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालयाने राज्यात प्रथम स्थान मिळविले आहे. या यशाबद्दल पुण्याच्या अन्न धान्य वितरण अधिकारी सुरेखा माने व पुणे शहर सर्व परिमंडळ अधिकारी तसेच सोलापूरचे अन्न धान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे …

Read More »

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू

प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत (पेपरलेस) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक …

Read More »

उदयनराजे संतापले, माझ्यामुळे जर भाजपची अडचण होत असेल तर..

भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता भाजपाला देखील इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असेल तर मी कदापी स्वस्थ बसणार नाही असा संताप व्यक्त करीत माझ्यामुळे जर भाजपाची अडचण होत असेल तर मी कारवाईला देखील घाबरत नाही असे …

Read More »